पिंपरी: विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) या मतदार पडताळणी मोहिमेत शहरातील मतदारांची नोंदणीची प्रक्रिया आत्तापर्यंत 67 टक्के इतकी झाली आहे. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघांतील तब्बल 23 टक्के मतदारांची नोंदणी अद्याप शिल्लक आहे. उर्वरित चार दिवसांत 100 टक्के मतदारांची पडताळणी करण्याचे आव्हान शिक्षक व बीएलओ यांच्यावर आहे.
मतदार पडताळणी मोहिमेत बीएलओंकडून मतदारांकडून गणना अर्ज भरून घेतला जात आहे. अर्ज वेळेत भरून सादर करणार्या मतदारांची नावे प्रारूप मतदार यादीत समाविष्ट करण्यात येत आहे. मात्र, बीएलओकडून घरोघरी जाऊन अर्ज भरून घेतले जात नाहीत. नगरसेवक, राजकीय पदाधिकार्यांच्या संपर्क कार्यालय तसेच, कॉलनी व वस्तीतील सभागृहात अर्ज भरून घेतले जात आहेत.
आत्तापर्यंत शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदार संघातील एकूण 67 टक्के मतदारांची पडताळणी पूर्ण करण्यात आली आहे. पिंपरी मतदार संघात एकूण 4 लाख 1 हजार 975 मतदार आहेत. चिंचवड मतदार संघात सर्वांधिक 6 लाख 87 हजार 448 आणि भोसरी मतदार संघात 6 लाख 35 हजार 114 मतदार आहेत. शहरात एकूण 17 लाख 24 हजार 537 मतदार आहेत.
उर्वरित 23 टक्के मतदारांची पडताळणी बाकी आहे. ही मोहिमेचा शनिवारी (दि.8) शेवटचा दिवस आहे. उर्वरित 4 दिवसात शिल्लक असलेल्या सर्व मतदारांपर्यंत पोहण्याचे आव्हान शिक्षक तसेच, बीएलओ यांच्यासमोर आहे. त्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे, असे अधिकार्यांनी सांगितले.
तसेच, मतदार यादी दुबार, मयत, स्थलांतरीत असे अनेक मतदारांची नावे आहेत. मतदारांचे पूर्ण पत्ते नसल्याने त्यांना शोधता येत नाही. काही मतदारांची नावे गावाकडे तसेच, दुसर्या शहरात आहेत. तसेच, फोनवरून संपर्क करूनही काही मतदार केंद्रावर येत नाहीत, असे काही बीएलओंनी सांगितले. नागरिकांमध्ये मतदार यादी नाव पडताळणीसाठी उत्साह नसल्याचे त्यांची उदासीनता दिसून येत आहे.
विधानसभानिहाय मतदारांची पडताळणीचे काम
पिंपरी विधानसभा मतदारसंघ : 67 टक्के
चिंचवड विधानसभा मतदारसंघ : 64 टक्के
भोसरी विधानसभा मतदारसंघ : 71