थकबाकीदारांच्या कार, टीव्ही, फ्रीज जप्त करणार; सव्वालाख निवासी मालमत्ताधारकांकडे 310 कोटींची थकबाकी Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri News: थकबाकीदारांच्या कार, टीव्ही, फ्रीज जप्त करणार; सव्वालाख निवासी मालमत्ताधारकांकडे 310 कोटींची थकबाकी

एकदाही मालमत्ताकर न भरलेले 34 हजार 22 घरे

पुढारी वृत्तसेवा

Property tax defaulters action

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील थकबाकीदार निवासी व बिगरनिवासी मालमत्ताधारकांवर महापालिकेने कारवाई सुरू केली आहे. तर, 34 हजार 22 जणांनी एकदाही कर भरलेला नाही. तब्बल 1 लाख 12 हजार 809 निवासी मालमत्ताधारकांकडे 310 कोटींचा थकीत कर आहे.

अशा थकबाकीदारांच्या कार, दुचाकी, टीव्ही, फ्रीज व घरातील महागड्या वस्तू जप्त करण्याची कारवाईची मोहिम हाती घेण्यात येणार आहे, असे सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांनी सांगितले. (Latest Pimpri News)

शहरात 7 लाख 31 हजार मिळकती

शहरात एकूण 7 लाख 31 हजार मिळकतींची नोंद आहे. त्यापैकी आत्तापर्यंत 4 लाख 26 हजार जणांनी मालमत्ताकराचा भरला आहे. मालमत्ता बिलासोबत थकबाकीदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. नोटीस देऊनही वारंवार मालमत्ता कर भरण्यास टाळाटाळ करणार्‍यांवर कारवाई केली जात आहे. कर न भरल्यास मालमत्ताही जप्त करण्यात येणार आहे. तब्बल 1 लाख 12 हजार 809 निवासी मालमत्ताधारकांकडे 310 कोटींचा थकीत कर आहे.

त्यांच्याकडे 5 ते 10 वर्षांपासून थकबाकी आहे. शहरात 50 हजारांपेक्षा अधिक थकबाकी असणार्यांची संख्या 28 हजार 518 आहे. एक लाखाहून अधिक थकीत असणार्‍या मालमत्तांची संख्या 9 हजार 147 इतकी आहे. पाच लाखांपेक्षा अधिक थकबाकी असणार्‍या व्यावसायिक मालमत्तांची संख्या 875 आहे. त्यातील थकबाकीदार निवासी मालमत्तांची कार, टीव्ही, फ्रीज व घरातील महागड्या वस्तू जप्त करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.

30 सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन कर भरल्यास सामान्य करावर 4 टक्के सवलत आहे. मोबाईलवरून सहज कर भरता येतो. त्यामुळे प्रत्येकाने आपला मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी मालमत्ता बिलाशी जोडावा. जेणेकरून सर्व सुविधा घरबसल्या मिळू शकतील.
- अविनाश शिंदे, सहायक आयुक्त, महापालिका
पाच किंवा 10 वर्षांपेक्षा अधिक काळ थकबाकी असलेल्या मालमत्तांधारकांवर कारवाई सुरू करण्यात येणार आहे. मालमत्ता कर न भरल्यास मालमत्ताही जप्ती करण्याची कारवाई अटळ आहे.
- प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, असे महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT