Property Tax Pudhari
पिंपरी चिंचवड

Property Tax Discount: पिंपरी-चिंचवडमध्ये मालमत्ताकर संकलनाला जोर; 30 जूनपूर्वी 10% सवलतीसाठी शेवटचे 20 दिवस

ऑनलाइन कर भरणाऱ्यांना मोठा प्रतिसाद; 315 कोटींपेक्षा अधिक कर जमा, नागरिकांना लवकर कर भरण्याचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागाकडून चालू आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये मालमत्ताकर संकलन मोहिमेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मालमत्ताकरावरील 10 टक्के सवलतीचा लाभ घेण्यासाठी केवळ 20 दिवस शिल्लक आहेत.

३० जून 2026 पूर्वी ऑनलाइन मालमत्ताकर भरणार्‍या मालमत्ताधारकांना सामान्यकरावर 10 टक्के सवलत देण्यात येत आहे. मालमत्ताकर भरला नाही, त्यांनी तो तात्काळ भरून सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे. ३० जूनपूर्वी मालमत्ताकर भरणार्‍या नागरिकांसाठी महापालिकेकडून विविध सवलती देण्यात येत आहेत.

ऑनलाइन माध्यमातून कर भरणार्‍या नागरिकांना सामान्यकरावर 10 टक्क्यांपर्यंत सवलत आहे. एक एप्रिल ते 10 जून 2026 या कालावधीत 2 लाख 94 हजार 971 मालमत्ताधारकांनी कर भरला आहे. त्यापैकी ऑनलाइन कर भरणार्‍यांची संख्या तब्बल 2 लाख 64 हजार 241 इतकी आहे. ऑनलाइन माध्यमातून आतापर्यंत 315 कोटी 60 लाख रुपयांहून अधिक कर जमा झाला आहे.

शहरात निवासी, व्यावसायिक, औद्योगिक, मिश्र वापराच्या मालमत्ता तसेच, मोकळ्या जागांसह एकूण 7 लाख 44 हजार 630 नोंदणीकृत मालमत्ता आहेत. सर्व मालमत्ताधारकांना महिला बचत गटांच्या माध्यमातून घरपोच बिल एप्रिल व मे महिन्यात वाटण्यात आली आहेत. तरीही अद्याप ज्या मालमत्ताधारकांनी कर भरला नाही, त्यांनी तो तात्काळ भरून सवलतीचा लाभ घ्यावा, असे आयुक्तांनी केले आहे.

‘तातडीने कर भरून सवलतीचा लाभ घ्या’

चालू आर्थिक वर्षात मालमत्ताकर संकलनाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः ऑनलाइन माध्यमातून कर भरणार्‍या नागरिकांची संख्या वाढली आहे. तीस जूनपूर्वी कराचे बिल भरणार्‍यांसाठी सवलती उपलब्ध आहे. नागरिकांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता तातडीने मालमत्ता कर भरावा. सवलतीचा लाभ घेण्यासाठी आता शेवटचे 20 दिवस शिल्लक आहेत, असे उपायुक्त सचिन पवार यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT