Property Tax Pudhari
पिंपरी चिंचवड

PCMC Property Tax Collection: पिंपरी-चिंचवड महापालिकेची दमदार वसुली; 2 महिन्यांत 280 कोटी मालमत्ताकर जमा

वाकड विभाग अव्वल; 2.71 लाख नागरिकांकडून कर भरणा, ऑनलाईनला मोठा प्रतिसाद

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागात दोन महिन्यांत मालमत्ताकरापोटी एकूण 280 कोटी रुपये जमा झाले आहेत. एकूण 2 लाख 71 हजार 5 जणांनी मालमत्ताकराचे बिल भरले आहे. त्यात सर्वांधिक 40 कोटी रुपयांचा भरणा वाकड विभागीय कार्यालयात झाला आहे.

शहरात 7 लाख 44 हजार 630 नोंदणीकृत मालमत्ता

शहरामध्ये निवासी, व्यावसायिक, औद्योगिक, मिश्र वापराच्या तसेच, मोकळ्या जागांसह एकूण 7 लाख 44 हजार 630 नोंदणीकृत मालमत्ता आहेत. महापालिकेकडून महिलांच्या नावावरील मालमत्ता, दिव्यांग नागरिक, पर्यावरणपूरक हाऊसिंग सोसायट्यांना विविध सवलती देण्यात येत आहेत. 30 जून 2026 पूर्वी मालमत्ताकर भरणाऱ्या नागरिकांसाठी विविध सवलती दिल्या जातात. तसेच, ऑनलाइन कर भरल्यास 10 टक्के सवलत देण्यात येते. यामुळे शहरवासीयांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

निवासी मालमत्ताधारकांनी केले 192 कोटी जमा

सन 2026-27 या चालू आर्थिक वर्षांत 1 एप्रिल ते 31 मे या दोन महिन्यांत 2 लाख 71 हजार 5 नागरिकांनी मालमत्ताकराची बिले भरली आहेत. ती एकूण रक्कम 280 कोटी 24 लाख 65 हजार 721 रुपये आहे. त्यात सर्वांधिक 192 कोटी रुपयांचा भरणा हा निवासी मालमत्ताधारकांनी केला आहे. बिगरनिवासी मालमत्ताधारकांनी 53 कोटी 87 लाख रुपये, मिश्र मालमत्ताधारकांनी 16 कोटी आणि मोकळा जागा व इतर मालमत्ताधारकांनी 19 कोटी रुपयांचा भरणा केला आहे. बिल जमा करून नागरिक सवलतीचा लाभ घेत आहेत.

ऑनलाईन मालमत्ताकर भरण्यास नागरिक प्राधान्य देत आहेत. घरबसल्या तसेच, कामाच्या ठिकाणाहून मोबाईलद्वारे मालमत्ताकराचे बिल भरले जात आहेत. तब्बल 2 लाख 43 हजार 201 जणांनी एकूण 257 कोटी 91 लाख 61 हजार 90 रुपये ऑनलाईन माध्यमातून जमा केले आहेत. दिवसेंदिवस ऑनलाईन माध्यमातून बिल भरण्यास मोठी पसंती दिली जात आहे.

वाकड विभाग अव्वल

वाकड विभागीय कार्यालयात सर्वांधिक 40 कोटी रुपयांचा भरणा केला गेला आहे. थेरगाव विभागात 25 कोटी 21 लाख, सांगवी विभागात 19 कोटी 98 लाख, पिंपरीगाव विभागात 19 कोटी 68 लाख, चिंचवड विभागात 19 कोटी 41 लाख, पिंपरी कॅम्प विभागात 14 कोटी 61 लाख आणि महापालिका भवन विभागात 12 कोटी 48 लाख रुपयांचा भरणा करण्यात आला आहे.

ऑनलाईन बिल भरल्यास तसेच, 30 जूनपर्यंत बिल जमा केल्यास सामान्यकरात 10 टक्के सलवत दिली जाते. त्याचा लाभ नागरिक मोठ्या संख्येने घेत आहेत. नागरिकांनी तातडीने मालमत्ताकराचे बिल भरून महापालिकेस सहकार्य करावे. थकबाकीदारावर मालमत्ता जप्तीची कारवाई सुरू आहे.
सचिन पवार, उपायुक्त, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT