Pimpri Chinchwad Municipal Corporation Pudhari
पिंपरी चिंचवड

PCMC Employees Promotions: पिंपरी-चिंचवड महापालिकेत मोठ्या प्रमाणावर पदोन्नत्या; अधिकाऱ्यांच्या बदल्यांनाही आयुक्तांची मंजुरी

कार्यकारी अभियंता, उपअभियंता, लेखापाल, आरोग्य अधिकारी, नर्सिंगसह विविध पदांवर सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अनेक कर्मचार्‍यांना पदोन्नती देण्यात आली आहे. त्यात कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, कार्यालय अधीक्षक, लेखापाल, सहाय्यक आरोग्य अधिकारी, मुख्य आरोग्य निरीक्षक, सिस्टर इनचार्ज, असिस्टंट मेट्रन, मेट्रन, नर्स मिडवाईफ, आरेखक, सांख्यिकी, फिटर, विद्युत पर्यवेक्षक आदी पदावर सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्यात आली आहे. तसेच, अनेकांचे विभाग बदलण्यात आले आहेत. त्यास नुकतीच आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अंतिम मान्यता दिली आहे.

स्थापत्य विभागाचे उपअभियंता दीपक करपे, किरण अंदुरे, मनोज बोरसे, शेखर गुरव आणि चंद्रकांत मोरे या पाच जणांची कार्यकारी अभियंतापदी पदोन्नती करण्यात आली आहे. स्थापत्य विभागाचे कनिष्ठ अभियंता संजय लोखंडे, अनिल गडदे, विवेक ताकवाले, अमोल उंडे, तानाजी ढेकळे, संदीप ठोकळे, सचिन मगर, श्रीनिवास कोरेवार, प्रतीक भसारकर आणि चेतन देसले या दहा जणांची उपअभियंता पदावर पदोन्नती करण्यात आली आहे. अनुरेखक पुष्पराज भागवत यांची आरेखक पदावर पदोन्नती करण्यात आली आहे. सांख्यिकी सहाय्यक सौरभ टेकवडे यांना सांख्यिकी पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.

उपलेखापाल शुभांगी चव्हाण, विनोद झुंझुरके, प्रियांका रणसिंग, अश्विनी निगडे, रोजश सोलंकी, पल्लवी कुलकर्णी, संदीप पवार आणि गणेश कोमकर या आठ जणांची लेखापाल पदी पदोन्नती करण्यात आली आहे. मुख्य लिपिक विष्णू त्रिकोणे, रोहिदास शेटे, देवीदास कुंभार, रवींद्र शिंदे, प्रमिला गायकवाड, नीता राणे, राकेश सौदे, विशाल भोईर, शिवाजी खेडकर, नंदा ढेंगळे, उमेश बांदल असे अकरा जणांची कार्यालय अधिक्षक म्हणून पदोन्नती करण्यात आली आहे. एएनएम सियोना बनसोडे यांना नर्स मिडवाईफ या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. मुख्य आरोग्य निरीक्षक अतुल सोनवणे, योगेश फल्ले आणि कांचनकुमार इंदलकर यांची सहाय्यक आरोग्य अधिकारी पदी पदोन्नती करण्यात आली आहे. आरोग्य निरीक्षक सुशील मलैय व अमित पिसे या दोघांची मुख्य आरोग्य निरीक्षक म्हणून पदोन्नती झाली आहे.

स्टाफ नर्स असलेल्या रजनी भुजबळ, राजश्री मखामले, प्रतिभा टाकळकर, अंजली तेलगू, कल्याणी जगदाळे, हेमतला शेवकर, माधुरी जिड्डीमनी, कविता जाधव, स्नेहा परब, माधुरी पंदारे, विद्या खलाटे, उज्वला कोंद्रे, वनीता गावडे, भारती मानमोडे या चौदा जणांची सिस्टर इनचार्ज म्हणून पदोन्नती करण्यात आली आहे. असिस्टंट मेट्रन सुरेखा कापरे यांची मेट्रनपदी पदोन्नती करण्यात आली आहे. विद्युत पर्यवेक्षक लक्ष्मण इटकर आणि राघवेंद्र धर्मकांबळे या दोघांची विद्युत विभागात कनिष्ठ अभियंता म्हणून पदोन्नती करण्यात आली आहे. वीजतंत्री कुंदन ढोरे, नाना नरुटे, चंद्रकांत कोंढवळे, राहुल सावंत, विजय काळाणे, अमोल चव्हाण, कृष्णा पारगे, संदीप पाटील, रमेश राठोड, प्रवीण गाडेकर आणि सुनील कांबळे या अकरा जणांनी विद्युत पर्यवेक्षक म्हणून पदोन्नती करण्यात आली आहे. मेटेन्सस हेल्पर सुहास ताकवले यांची फिटर पदावर पदोन्नती केली आहे.

कार्यकारी अभियंत्यांच्या बदल्या

कार्यकारी अभियंता या पदावरील अधिकार्‍यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. वैशाल ननावरे यांची बदली स्थापत्य मुख्यालय, हरविंदरसिंग बन्सल यांची बदली अ क्षेत्रीय कार्यालय, विजय जाधव यांची बदली ग क्षेत्रीय कार्यालय, सुनील शिंदे यांची बदली ज क्षेत्रीय कार्यालय आणि हेमंत देसाई यांची बदली बांधकाम परवानगी विभागात करण्यात आली आहे. तर, पदोन्नतीने कार्यकारी अभियंता झालेले दीपक करपे यांच्याकडे ड क्षेत्रीय कार्यालय, किरण अंदुरे यांच्याकडे ल क्षेत्रीय कार्यालय, मनोज बोरसे यांच्याकडे स्थापत्य प्रकल्प, शेखर गुरव यांच्याकडे झोनिपू स्थापत्य आणि चंद्रकांत मोरे यांच्याकडे स्थापत्य मुख्यालय विभागात पदस्थापना देण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT