पालिकेचे नेहरूनगर येथील भंगाराचे गोदाम आगीत खाक Pudhari
पिंपरी चिंचवड

Scrap Warehouse Fire: पालिकेचे नेहरूनगर येथील भंगाराचे गोदाम आगीत खाक

अण्णासाहेब मगर स्टेडियमजवळील गोदामातील जप्त केलेले बोर्ड, टपऱ्या, कपाट आणि लाकडी साहित्य जळून नष्ट; कोणीही जखमी नाही

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी : नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियमजवळील भंगार साहित्याच्या गोदामाला मंगळवारी (दि.14) सकाळी सहाच्या सुमारास अचानक आग लागली. त्यात अतिक्रमण विभागाने जप्त केलेले बोर्ड, टपऱ्या, कपाट,नामफलक, हातगाड्या, फलक, लाकडी व लोखंडी साहित्य मोठ्या प्रमाणात जळून खाक झाले.(Latest Pimpri chinchwad News)

भंगार साहित्याच्या गोदामाला आग लागल्याची माहिती मिळाल्यावर तात्काळ अग्निशमन पथक घटनास्थळी पोहचले. अग्निशमन दलाच्या 10 बंबांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, त्यात मोठ्या प्रमाणात जप्त केलेले साहित्य तसेच, भंगार साहित्य जळून खाक झाले.

उपअग्निशमन अधिकारी ऋषिकांत चिपाडे यांनी सांगितले की, भंगार गोदामामध्ये लाकूड व प्लास्टिक असल्यामुळे आग झपाट्याने पसरत होती. अग्निशमन पथकांनी सर्व दिशांनी पाण्याचे फवारे मारून आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.

नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियमजवळील महापालिकेच्या भंगार गोदामास आग लागल्याने साहित्य जळून खाक झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT