वडगाव मावळ: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने सुकाणू समितीसह ग्रामीण भागातील कोअर कमिट्याबरोबर शहरी भागातील कोअर कमिटीही जाहीर केल्या आहेत. आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी या समित्या जाहीर केल्या आहेत.
या कमिटीच्या माध्यमातून संबंधित शहरातील विकासकामे, पदाधिकारी निवड, शासकीय समित्या, निवडणुकीतील उमेदवारी याबाबत निर्णय घेतले जाणार आहेत. (Latest Pimpri News)
तळेगाव दाभाडे कोअर कमिटी : सत्येंद्रराजे दाभाडे, सत्यशीलराजे दाभाडे, सुनील शेळके, गणेश खांडगे, सुरेश चौधरी, सुरेश धोत्रे, कृष्णा कारके, चंद्रभान खळदे, अशोक भेगडे, विलास काळोखे, दिलीप खळदे, रामभाऊ गवारे, दर्शन खांडगे, गणेश काकडे, बाबूलाल नालबंद, अशोक दाभाडे, दौलतराव भेगडे, सुहास गरूड, बाबा मुलाणी, महेंद्र ओसवाल.
लोणावळा कोअर कमिटी : विलास बडेकर (प्रमुख), नारायण पाळेकर, जीवन गायकवाड, किरण गायकवाड, अरुण जोशी, भरत हरपुडे, गणेश इंगळे, रामभाऊ दुर्गे, मुकेश परमार, नरेश खोंडगे, मनोज लऊळकर, सुरेश मराठे, राजेश मेहता, रवि पोटफोडे, संजय घोणे, दिलीप पवार, सईद शेख.
देहूरोड कोअर कमिटी : प्रवीण झेंडे(प्रमुख), धनजंय मोरे, कृष्णा दाभोळे, जालिंदर राऊत, नंदकुमार पिंजण, नंदकुमार काळोखे, तानाजी काळभोर, कांती पारेख, बाळासाहेब जाधव, काशिनाथ दाभाडे, किशोर गाथाडे, संजय माळी, शंकर स्वामी, आशिष बन्सल, रेणू रेडडी, चंदा पवार, मुसा शेख, जाफर शेख, विकी जाधव.
देहू कोअर कमिटी : विवेक काळोखे (प्रमुख), रामदास काळोखे, रमेश काळोखे, ,विठ्ठल काळोखे, सुधीर मोरे, बापूसाहेब काळोखे, मच्छिंद्र चव्हाण, जालिंदर हगवणे, बाळासाहेब काळोखे, कैलास काळोखे, गुलाब काळोखे, सतीश काळोखे, प्रकाश हगवणे, सुनिल कडूसकर, राजू खेडेकर, कांतीलाल काळोखे, विकास कंद, शाखिर आत्तार, नितीन जाधव. दरम्यान, ग्रामीण भागासाठी आंदरमावळ, पवनमावळ, नाणेमावळ विभागनिहाय तसेच लोणावळा, तळेगाव, देहू, देहूरोड शहरांसाठी स्वतंत्र कोअर कमिट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. वडगाव शहराची कोअर कमिटी लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी सांगितले.