Mulshi Dam Pudhari
पिंपरी चिंचवड

Mulshi Dam Water Discharge: मुळशी धरण ८१ टक्के भरले; मुळा नदीत १००० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू

पावसाचा जोर कायम; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा, नदीपात्रात न उतरण्याचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: मुळशी धरण ८१ टक्के भरले आहे. पाऊस मोठ्या प्रमाणात होत असल्याने पाणी पातळीत वाढ होत आहे. धरणातील पाण्याची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी मुळशी धरणाच्या सांडव्यातून मुळा नदीत बुधवारी (दि. 22)सकाळी १०:३० वाजता 1000 क्युसेसने विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

पाऊस वाढत राहिल्यास तसेच, येवा वाढत गेल्यास परिस्थितीनुसार विसर्ग बदल करण्यात येईल. त्यामुळे मुळा नदीचे पात्र फुगणार असल्याने नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुळा नदीपात्रात कोणीही उतरू नये.

नदीपात्रात साहित्य किंवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. नागरिकांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी, असे आवाहन मुळशी धरणावरील टाटा पॉवरचे अधिकारी सुरेश कोंडूभैरी यांनी केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT