ST Bus pudhari photo
पिंपरी चिंचवड

MSRTC Travel Pass Online: एसटीचा ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ पास आता ऑनलाइन; पर्यटनाचे नियोजन झाले सोपे

चार ते सात दिवसांचे पास घरबसल्या मिळणार; साधी बस, शिवशाही आणि ई-बससाठी सुविधा उपलब्ध

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाची लोकप्रिय आवडेल तेथे कोठेही प्रवास योजनेचा पास आता ऑनलाइदेखील मिळणार आहे. चार ते सात दिवसांचे हे पास महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध केले आहेत.

नागरिकांना कमी खर्चात पर्यटन व धार्मिक स्थळांना जाता यावे, यासाठी १९८८ पासून ही योजना राबविली जाते. साधी बस, शिवशाही आणि ई-बस अशा तीन वर्गांसाठी हे पास उपलब्ध आहेत. याची वैधता पहिल्या दिवशी रात्री बारापासून ते शेवटच्या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत असते. पूर्वी हे पास काढण्यासाठी आगारात किंवा बसस्थानकावर जावे लागत असे.

असे आहेत फायदे

या पासच्या कालावधीत प्रवासी महाराष्ट्रात एसटीच्या कोणत्याही (नियोजीत नियंमानुसार लागू असलेल्या) गाड्यांमधून राज्यात कुठेही प्रवास करू शकतात.

नियोजन करणे सोयीचे

पर्यटनासाठी किंवा सलग सुट्ट्यांमध्ये फिरण्याचे नियोजन करणाऱ्या कुटुंबीयांसाठी आणि प्रवाशांसाठी ४ ते ७ दिवसांचे पास अत्यंत फिफायतशीर ठरतात.

येथे काढा पास

प्रवाशांना हे पास महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर (msrtc.maharashtra.gov.in) काढता येणार आहे. तसेच संकेतस्थळावर ऑनलाइन पास वितरणाची स्वतंत्र्य कार्यप्रणाली (पोर्टल) उपलब्ध आहे. तिथे प्रवासी आपली माहिती भरुन आवश्यक तो कालावधी (४ किंवा ६ दिवस) निवडून आणि ऑनलाइन पेमेंट करुन पास त्वरित मिळविता येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT