पिंपरी: स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालविल्याप्रकरणी कारवाई करून एकाला अटक करण्यात आली. ही कारवाई शुक्रवारी (दि. 27) रोजी रात्री सव्वानऊ वाजताच्या सुमारास मोशी प्राधिकरण परिसरातील करण्यात आली.
राज संतोष जयस्वाल (24, रा. बाधेनगर, एनआयबीएम, कोंढवा, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तसेच, आणखी एका 45 वर्षीय महिलेच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षातील सहाय्यक पोलिस फौजदार सुनिल जगनाथ शिरसाट (46) यांनी शनिवार (दि. 28) भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पा सेंटरच्या नावाखाली दोन महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात होता. घटनास्थळावरून रोख रक्कम व इतर साहित्य जप्त करण्यात आले. पुढील तपास भोसरी एमआयडीसी पोलिस करीत आहेत.