पिंपरी: मोशी कचरा डेपो दुर्घटनेसंदर्भात पिंपरी-चिंचवड महापालिकेचा वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाचे ठेकेदार ठाणे येथील अॅन्टोनी लारा रिन्युएबल एनर्जी प्रा. लि. या कंपनीस कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्या प्रकरणी अखेर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वेस्ट टू एनर्जीचे प्रकल्प प्रमुख अशोक कुमार सियाराम शरण गुप्ता (वय 59, रा. रिव्हर रेसिडेन्सी, मोशी. मूळ रा. उत्तर प्रदेश ) आणि सेफ्टी अधिकारी विजय रामराव सपकाळ ( वय 38, रा. बिजलीनगर, चिंचवड ) यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
त्या दोघानी आपल्या कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याने प्रशासकीय इमारत कोसळून 9 कर्मचाऱ्याचा नाहक बळी गेल्याची तक्रार महापालिकेचे कार्यकारी अभियंता सोहन निकम यांनी दिली आहे.