लोणावळा: लोणावळा शहर पोलिस ठाण्यात एका अकरा वर्षीय अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका 18 वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना 1 सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास लोणावळ्यातील हनुमान टेकडी परिसरातील सार्वजनिक शौचालयात घडली. याप्रकरणी मुलाच्या आजीने पोलिसात फिर्याद दिली आहे. फिर्यादीच्या तक्रारीनुसार, आरोपीने अल्पवयीन मुलास जबरदस्ती आत ओढून नेऊन त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला. (Latest Pimpri News)
त्यानंतर संबंधित कुटुंबीयांनी तातडीने पोलिस ठाण्यात धाव घेतली.या तक्रारीवरून पोलिसांनी बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा पोक्सो कायदा कलम 4 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेश रामाघरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक जाधव हे करत आहेत.