वडगाव मावळ: राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार मावळ तालुक्यातील जिल्हा परिषदेचे 5 गट व पंचायत समितीचे 10 गण अशा 15 जागांसाठी 5 फेबुवारीला मतदान होणार आहे. 243 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. तसेच 16 जानेवारीपासून वडगाव मावळ येथील तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार असल्याची माहिती प्रांताधिकारी सुरेंद्र नवले यांनी दिली.
निवडणूक आयोगाने आज मंगळवार (दि. 13) जानेवारी रोजी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील 12 जिल्हा परिषदा व 125 पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली. या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यातील 5 जिल्हा परिषद गट व 10 पंचायत समिती गणांची निवडणूक प्रक्रिया जानेवारी महिन्याच्या अखेरीस सुरू होणार असून, गुरुवार, दि. 5 फेबुवारी 2026 रोजी मतदान तर मंगळवार, दि. 7 फेबुवारी 2026 रोजी मतमोजणी व निकाल जाहीर होणार असल्याची माहिती मावळ-मुळशी प्रांताधिकारी सुरेंद्र नवले यांनी दिली.
निवडणूक कार्यक्रमानुसार 16 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रमाची अधिसूचना प्रसिद्ध करणार असून, 16 ते 21 जानेवारी या कालावधीत उमेदवारांना नामनिर्देशन अर्ज दाखल करता येणार आहेत. 22 जानेवारी रोजी दाखल झालेल्या अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. 27 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मुदत आहे. त्याच दिवशी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करून निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. 5 फेबुवारी रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार असून, 7 फेबुवारी रोजी मतमोजणी प्रक्रिया होणार आहे.
मावळ तालुक्यातील गट व गणनिहाय मतदारसंख्या
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणनिहाय मतदारसंख्या निवडणूक प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. यानुसार, मावळ तालुक्यात एकूण 2 लाख 316 मतदार असून, त्यामध्ये 1,02,082 पुरुष, 98,226 महिला व 8 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.
जि. प. गटनिहाय मतदारसंख्या
टाकवे बुद्रुक - 39,547
इंदुरी - 36,280
खडकाळे - 39,103
कुसगाव बुद्रुक - 39,611
सोमाटणे - 45,775
(एकूण मतदार : 2,00,316)
पं. स. गणनिहाय मतदारसंख्या
टाकवे बुद्रुक - 19,839
नाणे - 19,708
वराळे - 19,781
इंदुरी - 16,499
खडकाळे - 20,429
काळा - 18,674
कुसगाव बुद्रुक - 15,412
काळे - 24,199
सोमाटणे - 22,811
चांदखेड - 22,964
पंचायत समिती गणांमध्येही एकूण मतदारसंख्या 2,00,316 इतकीच आहे