Space Pudhari
पिंपरी चिंचवड

Maval Students ISRO NASA Study Tour: मावळच्या सात विद्यार्थ्यांची इस्रो-नासा-युरोपियन स्पेस एजन्सी अभ्यास दौऱ्यासाठी निवड

जिल्हा परिषदेच्या विशेष निवडप्रक्रियेत १०३ विद्यार्थ्यांची निवड; ग्रामीण विद्यार्थ्यांच्या यशाचे सर्वत्र कौतुक

पुढारी वृत्तसेवा

वडगाव मावळ: पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात आलेल्या विशेष निवडप्रक्रियेतून जिल्ह्यातील १०३ विद्यार्थ्यांची इस्रो, नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सीच्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे. त्यामध्ये मावळ तालुक्यातील स्वराली लोकरे, श्लोक तुळजापुरे व आराध्या भोईर या विद्यार्थ्यांसह सात जणांचा समावेश असून, त्यांचे विशेष कौतूक होत आहे.

मावळ तालुक्यातील आराध्या प्रशांत भोईर (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, दारुंब्रे), श्लोक भीमराव तुळजापूरे (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वराळे) यांची नासा अभ्यास दौऱ्यासाठी व युरोपियन स्पेस एजन्सीसाठी कार्तिक जालिंदर वाजे (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पुसाणे), इस्त्रोसाठी अभंग रोहिदास पाखरे (जि. प. प्राथमिक शाळा, सांगवडे), माही सदाशिव पवार (जि. प. प्राथमिक शाळा, कोयतेवस्ती) प्रीतम नामदेव शिरसाट (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नेसावे), स्वराली सचिन लोखरे (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, दिवड) यांची निवड झाली आहे. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश मावळच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.

प्रतिकूल परिस्थितीत विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश

या तिन्ही बालवैज्ञानिकांचे आमदार सुनील शेळके यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या यशाचे कौतूक करताना, ग्रामीण भागातील मुलांच्या बुद्धिमत्तेला, जिद्दीला आणि वैज्ञानिक कुतूहलाला अशा उपक्रमांमुळे नवे आकाश मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

मावळातील विद्यार्थ्यांच्या या यशामुळे त्यांच्या पालकांसह शिक्षक, मुख्याध्यापक आणि संपूर्ण शाळेचे कौतूक होत आहे. प्रतिकूल परिस्थितीतही विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असून, जिल्हा परिषद शाळांमध्येही गुणवत्तेची आणि प्रतिभेची कमतरता नसल्याचे या निवडीने अधोरेखित केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT