पिंपरी: चार जणांनी मिळून एका व्यक्तीला जमिनीच्या वादातून मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 12) दुपारी साबळेवाडी, खेड येथे घडली. या प्रकरणात राजेश हनुमंत काटकर (39, रा. साबळेवाडी, ता. खेड जि. पुणे) यांनी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी भरत सोपान काटकर, राजेद्र सोपान काटकर, राहुल एकनाथ काटकर, स्वप्नील एकनाथ काटकर (सर्व रा. साबळेवाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी राजेश काटकर यांनी आरोपींना जमीन उकरण्याचा जाब विचारला. (Latest Pimpri News)
त्या कारणावरून आरोपींनी काटकर यांना शिवीगाळ केली. फिर्यादीचा भाऊ प्रशांत याने शिवीगाळ करू नका, असे म्हटले असता आरोपी राहुल याने प्रशांतला दांडक्याने फिर्यादीच्या पायावर मारहाण केली. फिर्यादी त्याला अडवायला गेले असता आरोपी भरत याने त्यांच्या डोक्यात दगड मारला, ज्यामुळे त्यांच्या डोक्यातून रक्त येऊ लागले. फिर्यादीच्या आईने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता आरोपी राजेंद्र याने त्यांच्या कानशिलात मारली.