ST Bus  Pudhari
पिंपरी चिंचवड

Maharashtra ST Fake Disability ID: महाराष्ट्र बनावट दिव्यांग ओळखपत्रांवर कडक कारवाई

यूडीआयडी कार्ड तपासणी; बनावट ओळखपत्र वापरल्यास प्रवाशांना भविष्यातील सवलतीसाठी बंदी

पुढारी वृत्तसेवा

हेमांगी सूर्यवंशी

पिंपरी: राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांतून प्रवास करताना तिकीट दरात महिलांना 50 टक्के, तर विविध गटांसाठीही सवलती दिल्या जातात; मात्र काहीजण बनावट दिव्यांग ओळखपत्राच्या आधारे सवलतीचा गैरफायदा घेतात.

या बोगसगिरीला आळा घालण्यासाठी एस.टी. प्रशासनाकडून कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. प्रवासात प्रत्येक दिव्यांग प्रवाशांच्या यूडीआयडी (युनिक डिसॅबिलिटी) अर्थात स्वावलंबन कार्डची ऑनलाइन तपासणी केली जाणार आहे. संबंधित प्रवाशाकडे बनावट दिव्यांग ओळखपत्र आढळल्यास एस.टी. प्रशासनाकडून कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

पथकांद्वारे विशेष तपासणी

धावत्या बसमध्ये तपासणीदरम्यान संशयास्पद ओळखपत्र आढळल्यास ते जागीच जप्त करण्यात येणार आहे. तसेच एसटी महामंडळाच्या सर्व वाहक, पर्यवेक्षक आणि तपासणी पथकांकडून संबंधित प्रवाशांकडील ओळपत्रांची तपासणी केली जाणार आहे. यूडीआयडी कार्डच्या क्रमांक किंवा क्यूआरकोड स्कॅन केल्यावर संबंधित प्रवाशाची सर्व माहिती तात्काळ अधिकाऱ्यांना मिळू शकणार आहे. तपासणीदरम्यान ओळखपत्र बनावट असल्याचे स्पष्ट होताच ते पथकाकडून जप्त केले जाणार आहे. जप्त केल्यानंतर या कार्डांची स्वतंत्र नोंद ठेवण्यात येणार आहे. या व्यक्तीला भविष्यात कोणत्याही प्रकारच्या शासकीय सवलतीचा लाभ घेता येणार नाही.

फसवणूक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

बनावट व दिव्यांग ओळखपत्रे वापरणे हा कायद्याने गुन्हा आहे. असे असताना, अनेकजण याकडे दुर्लक्ष करतात. मात्र अशा पध्दतीने सुरू असणारी बनावटगिरी थांबविण्यासाठी ही माहीम राबविली जाणार आहे. यादरम्यान वैध किंवा अधिकृत यूडीआयडी कार्ड असणाऱ्या प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही.

एसटी महामंडळाच्या बसगाड्यांमध्ये दिव्यांगांना तिकीट दरात 75 ते 100 टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाते. त्यामुळे प्रवाशांचा एसटीकडे ओढा वाढतो. मात्र, वाढलेल्या गर्दीमधून तिकीट दरात सवलत मिळविण्यासाठी दिव्यांग आणि बनावट ओळखपत्र वापरतात. मात्र, हे कायद्याने गुन्हा आहे. असे असताना काही प्रवाशांकडून असे प्रकार घडत असल्यामुळे तपासणीदरम्यान कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे.
पल्लवी पाटील, आगारप्रमुख वल्लभनगर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT