हरविलेला चिमुकला सापडला  File Photo
पिंपरी चिंचवड

Missing News: हरविलेला चिमुकला विसावला पालकांच्या कुशीत

Missing boy Found: तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील इंदोरी येथे हा प्रकार घडला

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी : हरविलेला आठ वर्षीय मुलगा पोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे अवघ्या काही तासांत त्याच्या पालकांच्या कुशीत विसावला. तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील इंदोरी येथे हा प्रकार घडला.

भरत भगवान घोसले (8, रा. तळेगाव) असे मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी तळेगाव एमआयडीसी पोलिसांना इंदोरी बायपास येथे आठ वर्षीय मुलगा आढळला. तो त्याच्या पालकांना शोधत होता. पोलिसांनी त्याच्याकडे विचारपूस केली. मात्र त्याला पुरेशी माहिती देता येत नव्हती. पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन संवाद साधला असता त्याने केवळ बडा अस्पताल एवढेच सांगितले. त्यामुळे पोलिसांनी तळेगाव स्टेशन येथील जनरल हॉस्पिटल परिसरात त्याच्या आईला शोध घेण्यास सुरुवात केली.

दरम्यान, मुलाच्या आई-वडिलांचा शोध घेत असताना पोलिसांना समजले की, एक दाम्पत्य त्यांच्या हरवलेल्या मुलाला शोधत आहे. पोलिसांनी संबंधित दाम्पत्याशी संपर्क केला. आपले आई-वडील दिसताच मुलगा त्यांच्या कुशीत विसावला. पोलिसांनी दाखवलेल्या कार्य तत्परतेमुळे मुलगा अवघ्या काही तासात त्याच्या आई-वडिलांकडे सुखरूपपणे पोहोचला. या कामगिरीबद्दल तळेगाव एमआयडीसी पोलिसांचे कौतुक केले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT