नवी सांगवी: महापालिकेच्या आकाशचिन्ह परवाना विभागाकडून ’ह’ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत अतिक्रमण विभागाकडून धडक कारवाई करण्यात आली. सदर कारवाई पिंपळे गुरव, नवी सांगवी, जुनी सांगवी, दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी या परिसरात अतिक्रमण विभागाकडून फ्लेक्सवर धडक कारवाई करण्यात आली.
विविध सण, उद्घाटन, वाढदिवस आदी उत्सवांच्या निमित्ताने भर चौकात, रस्त्याच्या कडेला फ्लेक्सबाजी करण्यात आली होती. पिंपळे गुरव येथील सृष्टी चौक, गावठाण परिसर, काशी विश्वेश्वर, नवी सांगवी येथील काटे पुरम चौक, कृष्णा चौक, क्रांती चौक, साई चौक, फेमस चौक आदी परिसरात मुख्य चौकातील फ्लेक्समुळे परिसराचे विद्रुपीकरण होत असल्याने आकाश चिन्ह विभागाच्या अंतर्गत अतिक्रमण विभागाकडून धडक कारवाई करताना दिसून आले. (Latest Pune News)
सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत एकूण 20 फ्लेक्सवर तसेच विद्युत स्ट्रीट लाईट खांबांवरील 135 क्युऑक्स, 02 बॅनर यांवर धडक कारवाई करण्यात आली. कारवाई प्रसंगी आदी साहित्य सामग्री ताब्यात घेण्यात आल्या आहेत.
सदर कारवाई महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्या आदेशानुसार, आकाश चिन्ह परवाना उपायुक्त राजेश आगळे, प्रशासन अधिकारी ग्यानचंद भाट यांच्या मार्गदर्शनाखाली आकाश चिन्ह परवानाचे बीट निरीक्षक संजय भोईर, अतिक्रमण विभागाचे निरीक्षक राजू कांबळे, प्रकाश माने यांच्या उपस्थितीत धडक कारवाई करण्यात आली. यावेळी सोबत चार वाहनांचा ताफा, महाराष्ट्र सुरक्षा बल जवान, 10 कर्मचारी यांच्या सहकार्याने अतिक्रमण कारवाई करण्यात आली.