

पिंपरी: दारू पिण्यासाठी एका तरुणाच्या खिशातून जबरदस्तीने पैसे काढून घेतले. त्यानंतर तरुणाच्या आईवर तलवारीने वार करत जखमी केले. ही घटना गुरुवारी (दि. 21) अजिंठानगर, चिंचवड येथे घडली.
मयूर सुनील क्षेजे (28, रा. चिंचवड) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, प्रतिक कैलास गजरमल आणि दोन अल्पवयीन मुलांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी फिर्यादीच्या खिशातून एक हजार रुपये दारू पिण्यासाठी जबरदस्तीने काढले. आरोपींपैकी एकाने हातातील तलवार उगारली. (Latest Pune News)
फिर्यादी घाबरून पळत असताना त्यांची आई मध्ये आल्या. आरोपीने फिर्यादी यांच्या आईच्या डाव्या हाताच्या बोटावर किरकोळ जखम केली. तसेच, फिर्यादी आणि त्यांच्या आईला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपींनी हवेत तलवार फिरवत मी इथला भाई असे ओरडून दहशत निर्माण केली.