Assault Pudhari
पिंपरी चिंचवड

Hinjawadi Assault Case: हिंजवडीत महिलेवर अत्याचार; सात महिन्यांनी दहा जणांवर गुन्हा दाखल

धमकी, मानसिक तणावानंतर उशिरा तक्रार; पोलिसांकडून तपास सुरू

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: हिंजवडी परिसरात एका महिलेवर जबरदस्तीने दोघांनी अत्याचार करून तिला जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना 26 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास मारुंजी रोड परिसरातील एका घरात घडली.

या प्रकरणी सात महिन्यांनंतर दहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 54 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडित महिलेच्या मुलीने आरोपींमधील एकाशी रजिस्टर लग्न केले.

दरम्यान, आरोपींनी रीतीप्रमाणे लग्न करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, महिलेच्या मुलीला सासरी नेले नाही. लग्न कॅन्सल करण्यासाठी आरोपींनी महिलेला दोन फ्लॅट आणि दोन दुकाने देतो असे सांगितले. दरम्यान, महिलेने आपल्या मुलीला सासरी नांदवण्यासाठी घेऊन जाण्याची मागणी केली. त्याबाबत बोलणी करण्यासाठी महिला आरोपींच्या घरी गेली असता दोघांनी महिलेवर अत्याचार केला. मुलीसोबत लग्न करणार नसल्याचे सांगत महिलेला जीवे मारण्याची व तिचे व्हिडीओ व्हायरल करण्याची आरोपींनी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पीडित महिला दीर्घकाळ मानसिक तणावाखाली होती. सात महिन्यानंतर कुटुंबीयांना सांगून नंतर तक्रार दाखल केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT