Hinjewadi Shivajinagar Metro Pudhari
पिंपरी चिंचवड

Hinjawadi Shivajinagar Metro: हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोच्या उद्घाटनाबाबत नागरिकांमध्ये संभ्रम

पहिल्या टप्प्याला पुन्हा मुदतवाढ; ऑगस्टमध्ये शिवाजीनगर स्थानक सुरू होणार असल्याचा पीएमआरडीएचा दावा

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याला तारीख पे तारीख मिळत असताना आता शिवाजीनगर स्थानक ऑगस्ट महिन्यात प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असल्याचा दावा पीएमआरडीए करीत आहे, परंतु हा दावा कितपत खरा ठरणार याबाबत शहरातील नागरिकांमध्ये संभ्रमावस्था आहे.

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचा जूनपर्यंत पहिला टप्पा सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते, परंतु प्रत्यक्ष कामांमध्ये झालेल्या विलंबामुळे ही मुदत वाढविण्यात आली. यामुळे शहरातील नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटला.

तसेच, सोशल मीडियावर नागरिकांनी प्रश्नाचा भडीमार सुरू केला. यातच पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी नुकतीच हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाइनमधील शिवाजीनगर स्थानक ऑगस्ट महिन्यात प्रवाशांच्या सेवेत सुरू होणार असल्याची माहिती दिल्याने पहिल्या टप्पयातील 11 स्थानकांचा पत्ता नसून, शिवाजीनगर स्थानकाची घोषणा केल्याने नागरिकांमधून आणखी रोष व्यक्त होत असल्याचे दिसून येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT