पिंपरी: घरातील बैलाला मंदिरात का घेऊन गेले, या रागातून एकाच कुटुंबातील 12 जणांनी पाच जणांना मारहाण केली. याप्रकरणी दत्तात्रय गंगाराम चिंचवडे (51, रा. गणेश पेठ, मोरया गोसावी मंदिर, चिंचवड) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दिनकर रामचंद्र चिंचवडे (वय 45), मयूर राजेद्र चिंचवडे (वय 35), सागर राजेद्र चिंचवडे (वय 33), सुनील रामचंद्र चिंचवडे (वय 55), शुभम सुनील चिंचवडे (वय 24), आदित्य दिनकर चिंचवडे (वय 20), नितीन रामचंद्र चिंचवडे (वय 42), भुषण विजय चिंचवडे (वय 45), मंतन नितीन चिंचवडे (वय 21), भारत विजय चिंचवडे (वय 40), अजय माऊली चिंचवडे (वय 48), संकेत दत्रात्रे चिंचवडे (वय 22) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Pimpari chinchwad News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी घरी असताना आरोपींनी त्यांच्या घरासमोर येऊन फिर्यादीचा मुलगा सिद्धांश याला तू अगोदर बैल मंदिरात का घेऊन गेला, या रागातून मारहाण केली.
आरोपींनी फिर्यादी, त्यांचा मुलगा आकाश व सिद्धांश, पुतण्या किरण चिंचवडे आणि पुतणी निकिता विनोदे यांना लाठीने आणि ठोशाबुक्क्यांनी मारहाण करून किरकोळ जखमी केले. तसेच, फिर्यादीची पत्नी आणि भावजय यांना शिवीगाळ करुन जीवे ठार मारण्याची धमकी दिली. चिंचवड पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.