Metro Damage Water Pipeline: मेट्रोच्या कामामुळे निगडीत मुख्य जलवाहिनीला गळती; पालिकेकडून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू

नागरिकांनी पाणी जपून वापरावे
Pimpri News
मेट्रोच्या कामामुळे निगडीत मुख्य जलवाहिनीला गळती; पालिकेकडून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरूPudhari
Published on
Updated on

पिंपरी: निगडी येथे मेट्रो मार्गिकेचे काम सुरू आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पंपिंग झोनला पाणीपुरवठा करणाऱ्या 1200 मिलीमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला अचानक धक्का लागून पाणी गळती सुरू झाली. त्यात लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. ही गळती रोखण्याचे काम महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून युद्धपातळीवर करण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठ्यावर विपरित परिणाम होणार आहे.

मेट्रोचे काम सुरू असताना जलवाहिनीस धक्का लागून गळती सुरू झाली आहे. त्यात लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. त्यामुळे हा परिसर जलमय झाला होता. गळती रोखण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. हे काम तातडीने पूर्ण करून शुक्रवारी (दि. 26) सकाळपर्यंत पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचा पाणीपुरवठा विभागाचे प्रयत्न आहेत.  (Latest Pimpari chinchwad News)

Pimpri News
Post Office Server Down: ऐन दिवाळीच्या तोंडावर पोस्टाच्या सर्व्हरमध्ये बिघाड; चिंचवड पोस्ट कार्यालयात रांग

या कामामुळे चिखली, तळवडे, नेहरूनगर, संत तुकारामनगर, महेशनगर, कुदळवाडी, शाहूनगर, अजंठानगर, म्हेत्रेवस्ती, त्रिवेणीनगर, जाधववाडी, बोऱ्हाडेवाडी आदी भागांतील पाणीपुरवठा गुरुवारी (दि. 25) दिवसवर बंद ठेवण्यात आला होता. नागरिकांनी उपलब्ध पाणी जपून वापरावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

दरम्यान, यापूर्वीही अनेक वेळा मेट्रोच्या कामामुळे जलवाहिनी फुटली आहे. तसेच, दुर्घटना घडल्या आहेत. असे असतानाही महामेट्रोकडून निष्काळजीपणे काम केले जात असल्याने महापालिका प्रशासनाकडून तीव नाराजी व्यक्त केली जात आहे.

Pimpri News
Pune Market Committee Violence: बाजार समितीत सचिवांच्या कक्षात गुंडशाही; काही काळ तणावाचे वातावरण

नागरिकांनी पाणी जपून वापरावे

जलवाहिनी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पाणीपुरवठा लवकरात लवकर नियमित करण्यासाठी पाणीपुरवठा विभाग प्रयत्नशील आहे. तरी नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news