दिवाळीनिमित्त पिंपरीत 250 पेक्षा जादा एसटी बसची व्यवस्था Pudhari
पिंपरी चिंचवड

Diwali special ST buses: दिवाळीनिमित्त पिंपरीत 250 पेक्षा जादा एसटी बसची व्यवस्था; एचए मैदानावर अवतरले तात्पुरते बसस्थानक

गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी वल्लभनगर डेपोची विशेष तयारी; मराठवाडा, विदर्भ, कोकणसह विविध मार्गांवर धावणार जादा बस

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी : दिवाळी साजरी करण्यासाठी प्रवाशांना गावी ये-जा करताना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी पिंपरीत वल्लभनगर बस डेपोने सुमारे 250 पेक्षा जादा बसची सोय केली आहे. त्यामुळे पिंपरीतील एचए मैदान हे वल्लभनगर बसस्थानक बनले आहे.(Latest Pune News)

दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांचे सोयीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (एसटी) ने पिंपरी चिंचवड वल्लभनगर आगारातून जादा बस सोडल्या आहेत. दिवाळीनिमित्त गावी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. या बस मराठवाडा विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र कोकण या भागात धावणार आहेत. या भागातील नागरिकांना दिवाळीला गावी जाताना गैरसोय होऊ नये त्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी प्रवाशांनी लालपरी एसटी बसला पसंती दिली आहे.

पिंपरीत वल्लभनगर बसस्थानकात जादा बसची व्यवस्था करण्यात आली आहे. या बसची पार्किंग एचए मैदानावर केली आहे. रोज पार्किंगसाठी 200 ते 225 बसची सकाळी येजा असते. दिवाळीनिमित्त महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (एसटी) ने दिवाळीच्या मुहूर्तावर लहानमुले, महिला, ज्येष्ठ नागरिकांना वेगवेगळ्या योजनेतून तिकिटात सवलती दिल्या आहेत.

प्रवाशांना दिवाळीला गावी जाण्यासाठी जादा बुकींगची विशेष सोय केली आहे. दोन वाहतूक नियंत्रक व पार्किंगसाठी लागणारे मनुष्यबळ असे एकूण आठ कर्मचारी पार्किंगची देखरेख करतात. चालक वाहकची राहाण्याची सोय येथे केली आहे. 250 पेक्षा जास्त बसची पार्किंगची व्यवस्था केली आहे. जशी मागणी असेल तशा बस वल्लभनगर बसस्थानकात पाठवली जातात.
मारुती खळदकर, सहाय्यक वाहतूक निरीक्षक, रा. प.
दिवाळीचा सण तोंडावर आला आहे. बसची कमतरता आहे. तरी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (एसटी) बसची संख्या सध्या कमी पडत आहे. तरी वल्लभनगर बसस्थानकातून एसटी बसची जादा बसेस वाढविण्याची गरज आहे.
सातीराम वडमारे, प्रवासी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT