Death Pudhari
पिंपरी चिंचवड

Chikhali Suspicious Death: चिखलीत २४ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू; मृतदेहाजवळ दगड आढळल्याने खुनाचा संशय

घरकुल चौकाजवळ स्पाइन रस्त्यावर मृतदेह; पाय काळेनिळे पडलेले, शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: चिखली येथील स्पाइन रस्त्यावर घरकुल चौकाजवळ एका २४ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृत तरुणाचे पाय काळेनिळे पडलेले होते. तसेच, मृतदेहाजवळ दगड आढळल्याने त्याचा खून झाल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही घटना सोमवारी (दि. ९) सकाळी अकराच्या सुमारास उघडकीस आली.

लाल बहादूर राम (२४, रा. नेवाळेवस्ती, मूळ रा. उत्तर प्रदेश) असे मृत तरुणाचे नाव आहे. चिखली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रणजित जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, घरकुल चौकाजवळ एका अनोळखी तरुणाचा मृतदेह पडल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पाहणीदरम्यान मृतदेहाच्या अवस्थेवरून घातपाताची शक्यता व्यक्त करण्यात आली.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पिंपरी येथील महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात पाठविला. तपासादरम्यान मृत तरुणाची ओळख पटली. तो नेवाळेवस्ती परिसरात राहून मजुरीसह मिळेल ते काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, शवविच्छेदन अहवाल आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे. खुनाच्या संशयातून पोलिस संबंधित व्यक्तींचा शोध घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT