चेतन पवार 
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Municipal Election: पिंपरी-चिंचवडमध्ये महाविकास आघाडी होणार की नाही? ठाकरे गटाच्या नेत्याचे मोठे विधान

Chetan Pawar: महापालिकेतील भ्रष्ट कारभार रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन भाजपविरोधात निवडणूक लढवणे आवश्यक

पुढारी वृत्तसेवा

Pimpri Chinchwad Municipal Election Chetan Pawar On MVA

पिंपरी : "पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही पवार गट एकत्र निवडणूक लढविणार असल्याची चर्चा आहे. महाविकास आघाडी म्हणून सर्वांनी एकत्र येऊन भाजपविरोधात निवडणूक लढविल्यास भाजपला रोखता येईल, असा विश्वास व्यक्त करत सर्वपक्षीय विरुद्ध भाजप हीच लढाई भाजपला रोखण्यासाठी आवश्यक आहे. महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र सामोरे जाईल," अशी माहिती पिंपरी चिंचवडमधील ठाकरे गटाचे नेते चेतन पवार यांनी दिली. तसेच आघाडीच्या बोलणीत शिवसेनेला सन्मानजनक जागा मिळाल्या नाहीत तर शिवसेना आणि मनसे एकत्र या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

केवळ निवडणुकीपुरती आश्वासने

पाणी, ड्रेनेज व्यवस्था, वीज हेच प्रश्न आजही कायम आहेत. निवडणुका येतात, निवडणुका आल्या की आश्वासने दिली जातात. या आश्वासनांवर राजकारण होतं. नेते महापौर होतात. अनेक समितीचे अध्यक्षही बनले जातात. परंतु ज्या मूलभूत गरजा आहेत त्याकडे पुन्हा दुर्लक्ष केले जाते. भाजपने सांगितले होते की, चोवीस तास दररोज पाणी उपलब्ध करून देऊ असे सांगण्यात आले होते. मात्र आज परिस्थिती काय आहे. एवढा पाऊस झाल्यानंतरसुद्धा आज शहरात पाण्याची अवस्था सर्वांनाच माहिती आहे. २०२६ मध्ये होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये तेच मुद्दे पुन्हा घेतले जातील. जेव्हा जेव्हा लोक निवडणुकीला सामोरे जातात तेव्हा तेव्हा तेच मुद्दे घेतले जातात. तेच मूलभूत प्रश्न लोकांपुढे असतात. यावर ठोस उपाययोजना होत नाहीत याकडेही चेतन पवार यांनी लक्ष वेधले.

पिंपरी चिंचवडमधील शिवसेना ठाकरे गटाचा मतदार आजही ठाम

काही काही वर्षांमध्ये वेगवेगळ्या राजकीय घडामोडी झाल्या. यानंतर पिंपरी चिंचवड मतदारसंघातील शिवसेनेचा मतदार कायम आहे. लोकसभा निवडणुकीत संजोग वाघेरे पाटील यांना पिंपरी चिंचवड शहराने भरघोस मतदान केले होते. चिंचवड मतदारसंघात तब्बल १ लाख १४ हजार लोकांनी शिवसेनेला मतदान केले. पिंपरी मतदारसंघात ७६ हजार लोकांनी शिवसेनेला मतदान केले होते. नेते येतात-जातात, नेते पक्ष बदलतात; मात्र नेते स्वतःचा विकास करण्यासाठी पक्षांतर करतात. शिवसेनेचा आजही मतदार ठाम आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT