बीआरटी थांबे असून अडचण, नसून खोळंबा; प्रवाशांचे हाल सुरूच Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad BRT disruption: बीआरटी थांबे असून अडचण, नसून खोळंबा; प्रवाशांचे हाल सुरूच

जलवाहिनी व मेट्रोच्या कामामुळे पिंपरी-चिंचवड बीआरटी मार्ग ठप्प; प्रवाशांची सुरक्षा आणि वेळ दोन्ही धोक्यात

पुढारी वृत्तसेवा

खराळवाडी : महापालिका प्रशासनाने भरमसाठ खर्च करून उभा केलेला बीआरटी प्रकल्प आणि उशिराने सुरू केलेल्या पीएमपी बससाठी चिंचवड ते वल्लभनगर बीआरटी मार्गावर महापालिका पाणीपुरवठा विभागाने जलवाहिनीचे काम सुरू केल्यामुळे चिंचवड, काळभोरनगर, मोरवाडी, वल्लभनगर, खराळवाडी, एचए, कंपनी या बीआरटी बसथांब्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.(Latest Pimpri chinchwad News)

नाशिक फाटा, पिंपरी बीआरटी बसथांबा मेट्रोचे काम सुरू असल्यामुळे गेले दोन महिने झाले बंद आहे. त्यामुळे पिंपरी ते चिंचवड बीआरटी मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बंद बसथांब्यामुळे नाहक संकटांना सामोरे जावे लागत आहे. हे जलवाहिनीचे काम सुरू होऊन बरेच दिवस उलटले तरी अजूनही पूर्ण झाले नाही. त्यामुळे बीआरटी बसथांबा बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय झाली आहे. बीआरटी मार्गावर जलवाहिनीचे काम चालू असल्याने निवारा शोधत पुणे मुंबई महामार्गावर जीव मुठीत धरून पीएमपी बसची वाट पाहत थांबावे लागते अशी चर्चा प्रवाशांमधून ऐकायला मिळत आहे.

लाखो रुपये खर्च करून उभारलेल्या आणि दीर्घ प्रतीक्षेनंतर खुला केलेल्या ‌’पीएमपी‌’च्या (ाि)ि बसेससाठीच्या पिंपरी ते चिंचवड बीआरटी (इठढ) मार्गावरील बसथांब्यांचे काम सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. तरीही या मार्गाकडे प्रशासनाने सर्रासपणे दुर्लक्ष केल्याने प्रवाशांची गैरसोय झाली आहे. पण हे थांबे उभारण्यासाठी झालेला भरमसाठ खर्च वाया जाऊ लागला आहे. बीआरटी प्रमुख सतीश गव्हाणे यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. त्यामुळे हे काम लवकर होईल का नाही, हे सांगणे कठीण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT