पिंपरी: भोसरीतील दाट लोकवस्तीचा हा भाग आहे. प्रभागात राष्ट्रवादी काँग््रेासचे तीन तर, भाजपाचा एक नगरसेवक आहे. राष्ट्रवादीच्या ताब्यातील हा प्रभाग हस्तगत करण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे. तर, विधानसभा निवडणुकीत भाजपाला कडवी झुंज दिलेले राष्ट्रवादी काँग््रेासचे माजी शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक अजित गव्हाणे यांचे पॅनेलशी मुकाबला असणार आहे.
प्रभागात राष्ट्रवादीचे अजित गव्हाणे, अनुराधा गोफणे हे माजी नगरसेवक आहे. तसेच, अमोल फुगे, भाजपात असलेल्या माजी नगरसेविका प्रियांका बारसे राष्ट्रवादी काँग््रेास शरदचंद्र पवार पक्षात आहेत. ते राष्ट्रवादीकडून इच्छुक आहेत. तर, माजी नगरसेवक सागर गवळी, आमदार महेश लांडगे यांचे बंधू सचिन भैय्या लांडगे, राष्ट्रवादी काँग््रेासमधून आलेले इच्छुक तसेच प्रवीण लोंढे व त्यांच्या पत्नी, कविता भोंगाळे, आकाश फुगे व त्यांच्या पत्नी भाजपाकडून इच्छुक आहेत. पूर्वी संपूर्ण प्रभाग ताब्यात घेण्यासाठी भाजपाने रणनीती ठरविली आहे. तर, प्रभाग आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी राष्ट्रवादी मजबुतीने मैदानात आहे. आमदारांचा भाऊ सचिन भैय्या लांडगे व राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांचा पॅनेल असा सामना रंगणार आहे. त्याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.
प्रभागातील परिसर
रामनगर, तुकारामनगर, गुरुदत्त कॉलनी, गंगोत्री पार्क, सावंतनगर, महादेवनगर, गवळीनगर, श्रीराम कॉलनी, ज्ञानेश्वर नगर, चक्रपाणी वसाहत आदी
प्रभागातील कामे
भोसरी-आळंदी रस्त्यावर वाहनतळ उभारले आहे. प्रभागातील रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. जलवाहिनी तसेच, ड्रेनेजलाईन टाकण्यात आली आहे. गुळवेनगर येथे 25 लाख लिटार क्षमतेची पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे. दुसऱ्या टाकीचे काम सुरू आहे. प्रभागातील चौक व वर्दळीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
प्रभागातील जागांचे आरक्षण
अ-ओबीसी महिला
ब-ओबीसी
क-सर्वसाधारण महिला
ड-सर्वसाधारण
वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त
स्थानिक कामासाठी बाहेरून येऊन वसलेले, कामगार असे संमिश्र वर्ग या प्रभागात आहे. मतदार संख्या केवळ 44 हजार 691 इतकी आहे. अनधिकृत बांधकामांची संख्या मोठी असल्याने नागरी सुविधा निर्माण करण्यास मर्यादा येतात. भोसरीतील मुख्य बाजारपेठ, पीएमटी बस स्थानक प्रभागात असलेल्या दाट लोकवस्तीचा भाग आहे. अनधिकृत बांधकामांची संख्या मोठी आहे. दुकानदार, विक्रेत्यांचे अतिक्रमण, अंतर्गत रस्ते अरुंद तसेच, रस्त्यावर वाहने पार्क करण्याचे प्रमाण मोठे आहे. वाहतूक कोंडी नित्याची होत आहे. खड्डे व धुळीचा त्रास कायमचा आहे. हॉकर्स झोन नसल्याने विक्रेते रस्त्यावर बसतात. प्रभागात एमआयडीसीतील कामगार मोठ्या संख्येने भाड्याने राहतात. अनेक भागांत अस्वच्छता आणि घाणीचे सामाज्य दिसते. काही भागांत पाण्याचे टंचाई कायम आहे. गुरूदत्त कॉलनी, ज्ञानेश्वर कॉलनी, महादेवनगर, चक्रपाणी वसाहत येथे वारंवार गटारी तुंबत असल्याने रहिवाशांना घाणीचा सामना करावा लागतो. उद्यानातील खेळणी जीर्ण झाल्याने धोकादायक झाले आहेत. वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने गैरसोयीने नागरिक त्रस्त आहेत.