Stray Dogs Problem Pudhari
पिंपरी चिंचवड

Stray Dogs Problem: भोसरीत भटकी कुत्री जोमात; प्रशासन कोमात

पालिकेच्या संबंधित विभागाने नागरिकांच्या या समस्यापासून सुटका करावी, अशी मागणी नागरिकांतून जोर धरत आहे.

पुढारी वृत्तसेवा

भोसरी: भोसरी परिसरात रस्त्यावर मोकाट कुत्र्यांच्या सुळसुळाट दिवसेंदिवस वाढत आहे. परिसरातील अंतर्गत रस्त्यांवर कुत्र्याने व मोकाट जनावराने उच्छाद मांडला आहे. या मोकाट जनावरांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. पालिकेच्या संबंधित विभागाने नागरिकांच्या या समस्यापासून सुटका करावी, अशी मागणी नागरिकांतून जोर धरत आहे.

भोसरी परिसरातील नागरिक गेल्या अनेक दिवसांपासून मोकाट कुत्र्यांच्या समस्याने त्रस्त आहेत. परिसरातील उद्यान, मोकळे मैदानातील आवारात भटक्या कुर्त्यांनी चांगली दहशत माजवली आहे.

कुर्त्यांची झुंडी परिसरात फिरत असतात. ही सर्व कुत्री घोळक्यात असतात. कोणी नागरिकांनी कुत्र्यांना हाकलण्याचा प्रयत्न केला असता ते अंगावर धावून जातात. कुत्री दुचाकी वाहनचालकांच्या पाठीमागे धावत सुटतात. त्यामुळे वाहनचालक घाबरून व गडबडून जाऊन गाडीवरच्या ताबा सुटून अपघात होत आहे.

ह्या अपघातात बऱ्याच वाहनचालक किरकोळ व गंभीर स्वरुपात जखमी झाले आहेत. या त्रासातून पालिका प्रशासनाने भटक्या जनावरांचा व कुत्र्यांच्या जाचातून मुक्तता करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

वाहनचालकांची तारेवरची कसरत

मोकाट जनावरांचा नाहक त्रास भोसरीकरांना सहन करावा लागत आहे. वाहनचालकांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, महिलांना रस्त्यावरून चालताना भटक्या कुर्त्यांची भीती निर्माण झाली आहे.

मोकाट कुत्री येथील रस्त्यांवर बिनधास्तपणे बसलेली असतात. भटक्या कुत्र्यामुळे परिसरातील नागरिक, वाहनचालक व चाकरमानी त्रासलेल्या आहेत. वाहनांचा मागे लागत दुचाकी वाहनांनाही अपघाताच्या घटना घडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे

एखादा कुत्रा किंवा पिसाळलेल्या कुत्र्याने एखाद्याला चावा घेतल्यानंतर महापालिकेची यंत्रणा आठवडाभरा पुरती जागी होती. त्यानंतर यंत्रणा कोमात जाते. शहरात भटक्या कुत्र्यांची समस्या वाढत आहे. नागरिकांचे हित लक्षात व सुरक्षा प्राधान्य देत पालिकेने परिसरातील मोकाट कुत्र्यांच्या कायमस्वरूपी बंदोबस्त केला पाहिजे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT