खराळवाडी: शहरात उन्हाचा तडाखा वाढल्याने गर्मी खूप वाढली आहे. गर्मीतून सुटका होण्यासाठी व घरात गारवा निर्माण होण्यासाठी शहरातील व उपनगरांतील महिलावर्ग घराच्या बाल्कनीत बगीचा फुलविण्याला महत्त्व देऊ लागला आहे. यामुळे शहरातील रस्त्यांवर फुलझाडे विक्री करणारे, नर्सरीमध्ये नागरिक रोपांची खरेदी करताना दिसून येत आहेत.
विशेषतः पावसाचे दिवस तोंडावर असल्याने नागरिकांनी सरत्या उन्हाळ्यात फुलांच्या झाडांना अधिक प्रमाणात पसंती दिली आहे. फुलांच्या झाडांसाठी व इतर झाडांच्या लागवडीसाठी सोसायटीत फ्लॅटच्या गॅलरित सध्या बगीचा फुलवण्याची लगबग सुरू असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. उन्हाळ्यात गुलाब, मोगरा, जास्वंद, झेंडू, सदाफुली, चाफा, कमळ, रातराणी, सूर्यफूल आणि बोगनवेल या फुलांच्या झाडांना सध्या नागरिकांकडून मागणी आहे.
वाढत्या उष्णतेमुळे नर्सरीमध्ये रोपांची विशेष काळजी घेतली जाते. यामध्ये सावलीची व्यवस्था, ठिबक सिंचनाचा योग्य वापर, वेळोवेळी खतांचा पुरवठा केला जात आहे. रोपे लावण्यासाठी मातीच्या कुड्यांनाही ग््रााहकांकडून मोठी मागणी आहे. ज्यामुळे रोपांची मुळे गार राहण्यास मदत होते. योग्य नियोजनासाठी उन्हाळ्यात रोपांची खरेदी केल्यानंतर, ती सुकू नयेत म्हणून सकाळ-संध्याकाळ पाणी देणे, तसेच योग्य सावलीत ठेवणे, त्याची योग्य मशागत करून ठेवणे हे कामे सध्या केली जात आहेत.
गुलाब 100 ते 150, मोगरा 100 ते 130,जास्वंद 80 ते 100, झेंडू 100 ते 90, सदाफुली 100 ते 80, चाफा 75 ते 100, कमळ 120 ते 150, रातराणी 90 ते 100, सूर्यफूल 80 ते 100, बोगनवेल 75 ते 100 रुपये. सध्या रोपं टाकली की ते जून महिन्यात विक्रीसाठी तयार होतात. फुलांचे पीक साधारण तीन महिन्यांत तयार होते. त्यासाठी आतापासूनच नागरिकांनी रोपे खरेदीला सुरुवात केली आहे.- गजानन कांबळे, शेतकरी.
सध्या गारवा निर्माण करण्यासाठी हिरवेगार झाडांची खरेदी केली आहे. हे झाडे पावसाळ्यात मोठमोठी होऊन सुगंध देतील. येत्या आठ दिवसांच्या कालावधीत नर्ससरीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फुलांचे वृक्ष पाहून ते गॅलरीत कुंडीत बसते का, याची चाचपणी करून फुलांच्या झाडांचे वेगवेगळ्या प्रकारचे व्हारायटी शोधून वृक्ष खरेदी केली आहे.- उमा सिरसाठ, निसर्गप्रेमी.