पिंपरी: मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीत मित्राला लघुशंका करू नको म्हटल्याने एका तरुणावर चाकूने वार करत खून करण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी (दि. 2) रात्री म्हेत्रे वस्ती, चिखली येथे घडली.
विशाल पाटील (31, रा. चिखली) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, यश विनोद कपाट (रा. चिखली) आणि त्याच्या दोन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Pimpri News)
विशाल त्यांचा मित्र गोपाळ सुरडकर याच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये गेले होते. तिथे यश कपाट हा हॉलमध्ये लघुशंका करत होता. त्याला टॉयलेटमध्ये जाऊन लघुशंका करण्यास विशाल यांनी सांगितले. त्या रागातून यश याने विशाल यांना धमकी दिली.
त्यानंतर सागर दुधाळ याने विशाल यांना म्हेत्रेवस्ती चिखली येथे बोलावून त्याच्या दोन साथीदारांनी विशाल यांच्यावर चाकूने वार करत हल्ला केला. सागर याने चाकू हिसकावून घेतला असता यश याने लाकडाने मारून विशाल यांना ठार मारण्याचाप्रयत्न केला.