...तर कठोर निर्णय घ्यावे लागतील; हिंजवडीच्या समस्यांबाबत अजित पवार यांची स्पष्ट भूमिका  Pudhari
पिंपरी चिंचवड

Ajit Pawar News: ...तर कठोर निर्णय घ्यावे लागतील; हिंजवडीच्या समस्यांबाबत अजित पवार यांची स्पष्ट भूमिका

गेल्या आठवड्यातील कामाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

पुढारी वृत्तसेवा

Ajit Pawar Hinjawadi Visit

पिंपरी: हिंजवडीतील नागरी समस्या आणि वाहतूक कोंडीबाबत सर्वच विभाग एकत्र कार्यवाही करत आहे. याबाबत स्थानिक नागरिक आणि आयटी कर्मचाऱ्यांनी देखील समाधान व्यक्त केले. रस्त्याच्या रुंदी वाढवाव्या लागणार आहेत. कोणाला त्रास द्यायचा हेतू नाही मात्र कायमचे समस्या मोडीत काढायची आहे. त्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, अशी स्पष्ट भूमिका राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी घेतली.

हिंजवाडी पार्कच्या समस्याने आयटीयन्स त्रस्त आहेत. वाहतूक कोंडी नेहमीचीच झाली आहे. त्यात पावसाळ्यात आयटी पार्कमधील रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले आहे. त्यामुळे दोन आठवड्यांपूर्वी अजित पवारांनी पाहणी करत विकासकामांच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या होता. त्यानंतर आज पुन्हा त्यांनी याचा आढावा घेतला. दरम्यान, गेल्या आठवड्यातील कामाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. (Latest Pimpri News)

आज (शनिवारी) पहाटे सहा वाजता अजित पवार हिंजवडीमध्ये पोहोचले.अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनेनुसार काम सुरू झाले आहे का? याची पाहणी ते करत होते. विकासकामांमध्ये अडथळे येत असतील तर, कठोर निर्णय घ्या, असे देखील त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. केवळ वाहतूक कोंडीस नव्हे तर पाण्याचे, रस्त्याचे आणि एकूणच सर्वांगीण विकासाबाबत त्यांनी बैठक घेतली. शहरातील वाहणाऱ्या तिन्ही नद्यांची स्वच्छतेबाबत देखील त्यांनी मंत्रालयातून आवश्यक तो पाठपुरावा करू असे यावेळी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT