जीपीएस ट्रॅकिंग Pudhari File Photo
पिंपरी चिंचवड

Ring Road News : रिंग रस्ता अचूक मोजमापासाठी जीपीएस प्रणालीचा अवलंब

पीएमआरडीएच्या भूमिअभिलेख विभागाकडून वापर सुरू

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी : पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरणअंतर्गत नियोजित चक्राकार वाहतूक रस्ता, इतर अंतर्गत रस्ते आणि प्रकल्पासाठी जीएनएसएस याअंतर्गत जीपीएस प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे जागेच्या ठिकाणी जाऊन त्याचे अचूक मोजमाप घेता येते. तसेच, त्याची नेमकी माहिती व लोकेशनही जतन करून ठेवता येते. यामुळे कमी वेळेत जास्त काम होत असून, पहिल्यांदाच रिंग रस्त्याच्या मोजमापासाठी याचा वापर केला जाणार आहे.

पीएमआरडीएच्या हद्दीत जमीन व मालमत्ता विभागाच्या वतीने नुकतेच भूमापकांना जीएनएसएसबाबत प्रशिक्षण देण्यात आले. याचबरोबर (आरटीके) रियल टाईम किनमॅटिक या प्रणालीबाबतदेखील माहिती देण्यात आली. या अद्ययावत यंत्रणेमुळे काम सोपे आणि लवकर होणार आहे. त्याचप्रमाणे कोणत्याही स्थानाचे अवघ्या 3 ते 5 सेंटिमीटरपर्यंत अचूक मोजमाप करणे शक्य होणार आहे. याबाबत प्रशिक्षणात भूमी अभिलेख विभागाच्या अधीक्षक आशा जाधव, उपअधीक्षक शिवाजी पंडित यांनी मार्गदर्शन केले.

यापूर्वी या संबंधित कामे पीएमआरडीएकडून करण्यात येत नव्हती. त्यामुळे खासगी यंत्रणेचा वापर करावा लागत होता. परिणामी, त्यासाठी वेळ लागत होता. तसेच, या यंत्रणेवर अवलंबून राहावे लागत होते. त्यानंतर आता पीएमआरडीएकडून ही कामे केली जाणार आहेत. त्यााठी जीएनएसस आणि कॉर्स या प्रणाली अंमलात आणल्या जात आहेत.

नियोजित रस्त्याचे सीमांकन हे अचूकतेने होण्यासाठी या प्रणालाची वापर करण्यात येणार असून, जीएनएसएस म्हणजेच ग्लोबल नेव्हिगेशन सॅटलाईट सिस्टिम या माध्यमातून त्याचा मोजमाप काढण्यात येणार आहे. सर्वेक्षणच्या मशिनद्वारे सेटलाईटकडून संदेश देत त्याबाबतची माप साठवले जाते. प्रत्येक ठिकाणी आणि नेमून दिलेल्या ठिकाणी जावून त्याची माहिती गोळा केली जाते. त्या डेटाच्या आधारे पुढे नकाशा तयार करण्यात येतो आणि तो प्रकल्पासाठी अथवा रस्त्याला वापरला जातो.

ही कामे होणार सोपी

  • डी. पी. रस्त्याचे सीमांकन

  • भूसंपदानाचे अचूक आणि योग्य मोजमाप

  • टीडीआर बदल्यात सुविधांचे हस्तांतरण

  • इलिव्हेशन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT