बापरे..! सहा महिन्यांत 124 जणांना सर्पदंश; एकाचा मृत्यू File Photo
पिंपरी चिंचवड

Snakebite Cases: बापरे..! सहा महिन्यांत 124 जणांना सर्पदंश; एकाचा मृत्यू

सर्पमित्रांना दिवसाला 10 ते 15 कॉल

पुढारी वृत्तसेवा

Snakebite incidents rising

वर्षा कांबळे

पिंपरी: पावसाळा सुरू झाला, की साप ही या दिवसांत मोठ्या प्रमाणात आढळतात. यामुळे याच दिवसांत दरवर्षी सर्पदंशाच्या घटना अधिक होत असल्याचे चित्र आहे. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी 2025 ते जुलै महिन्यापर्यंत 124 जणांना सर्पदंश झाला असून एकाचा मृत्यू झाला आहे.

सध्या पावसाळ्यामुळे नागरीवस्तीमध्ये झाडेझुडपे वाढण्याचे प्रमाण जास्त असते. तसेच लोकवस्तीजवळ असलेला कचरा लवकर उचलला गेला नाही, तर त्यामुळे उंदिर, घूस येतात. उंदिर हे सापांचे अन्न असल्याने अन्नाच्या शोधार्थ ते नागरीवस्तीमध्ये येतात. दर दिवशी सर्पमित्रांना शहरातील वेगवेगळ्या भागातून 10 ते 15 कॉल्स येतात.  (Latest Pimpri News)

सर्पदंशाची लस फक्त शासकीय, पिंपरी चिंचवड मनपाच्या रुग्णालयातच मिळते. खासगी रुग्णालयात फक्त प्रथमोपचार करून व्यक्तीला शासकीय किंवा पालिकस रुग्णालयात पाठविले जाते.

पिंपरी-चिंचवड शहराजवळील खेड, मंचर आदी भागातून सर्पदंशाचे रुग्ण उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात येतात. पालिका रुग्णालयांत सर्पदंशावरील इंजेक्शन मोफत देण्यात येते. पूर्वी सर्पदंशाची लस फक्त वायसीएममध्येच उपलब्ध होती. त्यामुळे सर्पदंश झालेल्या व्यक्तीला वायसीएम रुग्णालय गाठावे लागत होते.

महापालिकेच्या फक्त वायसीएम, थेरगाव, आकुर्डी, भोसरी, पिंपरी या पाच ठिकाणी सर्पदंशाची लस उपलब्ध आहे. शहराबरोबर खेड व मंचर याठिकाणाहून एक दोन रुग्ण येत असतात.

सर्पदंश झाल्यावर प्रथमोपचार काय करावा

  • सर्पदंश झाल्यावर तत्काळ वैद्यकीय मदत मिळणे शक्य नसते व ती मिळण्यापूर्र्वी केलेले उपचार करणे गरजेचे असते.

  • जखम स्वच्छ पाण्याने धुवा.

  • सर्पदंश झालेल्या व्यक्तीला धीर द्यावा.

  • पायी चालणे, जास्त बोलणे टाळावे.

  • विषारी साप हाताला चावला असेल तर दंडाला दोरीने बांधून

  • आवळून बांधावे.

  • विषारी साप पायाला चावला असेल तर मांडीला दोरीने बांधून

  • आवळून बांधावे. आवळपट्टी बांधताना दंड व दोरीच्यामध्ये पेन, काडी किंवा बोट धरावे. बांधल्यानंतर ते बाहेर काढावे.

  • सर्पदंश झालेल्यास चहा, कॉफी किंवा कोणतेही पेय देवू नये.

  • दंश झालेल्या जागेवर चिरा किंवा काप घेऊ नये, त्यामुळे जास्तीचा रक्तस्राव होऊन व्यक्ती दगावण्याची शक्यता असते.

  • रुग्णालयात जाताना शक्यतो डॉक्टरांना फोनवर कळवावे जेणेकरून त्यांना तत्काळ मदत करता येईल.

  • दंश झालेल्या व्यक्तीला दमा किंवा अ‍ॅलर्र्जी अथवा एखादा आजार असल्यास डॉक्टरांना कळवावे.

घराजवळ झाडेझुडपे वाढलेली असल्यास किंवा खरकटे आणि घाण असल्यास त्याठिकाणी सापांचा वावर असतो. यासाठी घर आणि परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. दिवसाला आम्हाला 10 ते 15 कॉल असतात. यामध्ये बिनविषारी आणि विषारी सापांचा समावेश असतो.
विक्रम भोसले (सर्पमित्र, रेस्क्यु टीम पुणे वनविभाग)
महापालिकेच्या वायसीएम, जिजामाता रुग्णालय, आकुर्डी, भोसरी, थेरगाव या पाच रुग्णालयांत सर्पदंशाची लस उपलब्ध आहे. सर्पदंश झालेल्या व्यक्तीला अतिदक्षता विभागात ठेवावे लागते. त्यामुळे ज्या रुग्णालयात अतिदक्षता विभाग आहे, त्याठिकाणी लस उपलब्ध आहे.
डॉ. लक्ष्मण गोफणे (आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिं.चि. मनपा)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT