पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पिंपरी चिंचवड येथील हिंजवडीमध्ये भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने दुचाकीस्वराला पाठीमागून जोरदार धडक दिली. या घटनेनंतर ट्रकचे मागील चाक दुचाकीस्वाराच्या अंगावर तब्बल दहा मिनिटं होतं. कंबरेखालील शरीराचा भाग चाकाखाली चिरडला गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. २३ ऑगस्टला सकाळी साडे सातच्या सुमारास हिंजवडीतील लक्ष्मी चौकात हा अपघात झाला. रामदास दिगंबर वडजे (२७, रा. लक्ष्मी चौक, हिंजवडी), असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी संजय माधव वडजे (२८, रा. गुरुद्वारा दिल्याने चौक, आकुर्डी) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी ट्रकचालक रंगनाथ रामभाऊ तांबे (४५, रा. दिघशी, ठाणे) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ बुधवारी सकाळी रामदास दुचाकीवरून ऑफिसला जात होता. त्यावेळी पाठीमागून आलेल्या ट्रकने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघातानंतर ट्रकचे मागील चाक दुचाकीस्वाराच्या शरीरावर तब्बल दहा मिनिटं होतं. कंबरेखालील शरीराचा भाग चाकाखाली चिरडला गेला. अंगावरून चाक गेल्याने रामदास यांचा मृत्यू झाला. रस्त्याने जाणाऱ्या चालकाने मोबाईलमध्ये घटनेचे चित्रीकरण केले. ही चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली.
हेही वाचा