सलग पाच दिवस इंधन दरात वाढ केल्यानंतर आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी इंधन दरवाढीला ब्रेक दिला. ( Petrol & Diesel Prices ) पाचही दिवस इंधन दरात प्रत्येकी 35 पैशांची वाढ करण्यात आली होती. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर अजुनही चढेच असून प्रति बॅरल ब्रेंट क्रूडचे दर आता 85 डॉलर्सच्या वर गेले आहेत.
देशात बहुतांश सर्व ठिकाणी पेट्रोलचे दर शंभर रुपयांच्या वर गेले असून अर्ध्या देशात डिझेल दराने शंभर रुपयांची पातळी ओलांडलेली आहे. देशाची राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर सध्या 107.59 रुपयांवर स्थिर असून डिझेलचे दर 96.32 रुपयांवर आहेत. मुंबईत हेच दर क्रमशः 113.46 आणि 104.38 रुपयांवर आहेत. प. बंगालमधील कोलकाता येथे पेट्रोल 108.11 रुपयांवर असून डिझेलचे दर 99.43 रुपयांवर आहेत. तामिळनाडूतील कोलकाता येथे हेच दर क्रमशः 104.52 आणि 100.59 रुपयांवर स्थिर आहेत.