लंडन : वृत्तसंस्था : ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ पीटर हिग्ज (वय 94) यांचे निधन झाले. त्यांनी भारतीय संशोधक सत्येंद्रनाथ बोस यांच्यासह (एकत्रित नव्हे) 'हिग्जबोसॉन' म्हणजेच 'देवकणा'चा (गॉड पार्टिकल) शोध लावला होता. बिगबँगनंतर (महास्फोट) विश्वाची निर्मिती कशी झाली, हे या संशोधनामुळे स्पष्ट झाले होते.
'गॉड पार्टिकल'च्या संशोधनासाठी हिग्ज यांना 2013 मध्ये तिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक देण्यात आले. हिग्ज हे गेले बरेच दिवस आजारी होते. एडिनबर्ग विद्यापीठात अनेक वर्षे प्राध्यापक असलेल्या हिग्ज यांच्यासह बोस आदी शास्त्रज्ञांनी 1960 च्या दशकातच विश्व कशापासून बनले आहे, हे समजून घेण्याचा प्रयत्न सुरू केलेला होता. 2012 मध्ये जेव्हा त्याचे उत्तर मिळाले, तेव्हा विश्वाच्या उत्पत्तीचे मूळ असलेल्या कणाला 'गॉड पार्टिकल' तसेच 'हिग्जबोसॉन' हे नाव देण्यात आले. तोवर इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन, प्रोटॉन हेच जगाला माहिती होते. 'गॉड पार्टिकल' ही तोवर केवळ एक कल्पना होती. हिग्ज यांनी शास्त्रीयद़ृष्ट्या ती सिद्ध केली.
1929 मध्ये पीटर हिग्ज यांचा जन्म ब्रिटनच्या न्यूकॅसल येथे झाला. अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. डिरेक पदक, युरोपियन भौतिकशास्त्र समितीचा सन्मान, वुल्फचा त्यात समावेश आहे. 'गॉड पार्टिकल'च्या संशोधनात भारताचा सिंहाचा वाटा होता. भारतीय शास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस यांच्या बोस, तर पीटर हिग्ज यांच्या हिग्ज या आडनावांवरूनच 'गॉड पार्टिकल'ला 'हिग्जबोसॉन' हे नाव देण्यात आले आहे.
सत्येंद्रनाथ बोस यांनी क्वांटम स्टॅटिस्टिक्सवरील आपला एक शोधनिबंध 1924 मध्ये अल्बर्ट आईन्स्टाईन यांना पाठवला होता. आईन्स्टाईन यांनीच या संशोधनाला 'बोसॉन' हे नाव दिले होते.
'हिग्जबोसॉन' हा देवकण अन्य कणांना भार देतो. 'हिग्जबोसॉन' नसते तर तारे तयार झाले नसते. आकाशगंगाही नसत्या, मग ब्रह्मांड काही वेगळेच राहिले असते.
भारमान अन्य वस्तूंना आपल्यात सामावून घेऊ शकते. जेथे काहीच नसेल अशा भागात (पोकळीत) कुठल्या तरी पदार्थाचे अणू फिरत राहतील. परस्परांत मिसळणार मात्र नाहीत. जेव्हा या अणूंमध्ये भार निर्माण होईल, तेव्हाच ते परस्परांत मिसळतील.
हेही वाचा :