amitabh bachchan 
Latest

Amitabh Bachchan :गरमीत थंडाव्यासाठी केलेला ‘हा’ जुगाड अमिताभ बच्चन यांनाही आवडला (Video)

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. दररोज ब्लॉग लिहिण्याबरोबरच, बिग बी फेसबुक-ट्विटर आणि इन्स्टाग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चाहत्यांसह मनोरंजक पोस्ट देखील शेअर करताना दिसतात. पुन्हा एकदा त्यांची एक पोस्ट व्हायरल होत आहे. बिग बी कविता जास्त शेअर करत असले तरी त्यांच्या अलीकडची पोस्ट एक मजेदार चित्र मांडणारी आहे. (Amitabh Bachchan)

सौरऊर्जेवर चालणारा पंखा

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये एक साधू दिसत आहे. ज्याने उन्हापासून बचावासाठी जबरदस्त जुगाड काढला आहे. साधूने डोक्यावर पंखा बांधला आहे, हा पंखा सोलर प्लेटद्वारे चालतो. सोलर प्लेटही त्याने डोक्यावर अगदी व्यवस्थित बसवली आहे आणि ती जोडून कपाळावर पंखा बांधला आहे.

बिग बींनी मस्त कॅप्शन लिहिलंय. त्यांनी म्हटलंय- व्हिडिओमध्ये एक व्यक्ती साधूला 'पंखा उन्हात चालतो का?', असे विचारताना दिसत आहे. साधू म्हणतो, उन्हात धावेल, सावलीत थांबेल. सूर्य जितका प्रखर असेल तितका त्यात वारा येईल. त्या व्यक्तीने विचारले की यातून मोठा आराम मिळत असेल? साधू म्हणतो- 'का नाही भाऊ! हे डोक्यावर आहे. हा व्हिडिओ शेअर करत बिग बींनी लिहिले की, 'भारत ही शोधाची जननी आहे. भारत माता चिरंजीव हो.'

बिग बींच्या या पोस्टवर यूजर्सकडून अनेक कमेंट येत आहेत. सर्वजण साधूची स्तुती करत आहेत. यासोबतच हवामान बदलावरही लोक चिंता व्यक्त करत आहेत. एका युजरने लिहिले की, 'हवामान बदल ही एक गंभीर समस्या आहे, त्याचा सर्वाधिक परिणाम गरिबांवर होत आहे.' दुसर्‍या युजरने लिहिले की, 'मोडिफाईड केले गेले आहे.' दुसऱ्या युजरने लिहिले की, 'हे तंत्रज्ञान भारताबाहेर जाऊ नये.' एका युजरने लिहिले की, 'जर प्रत्येकाने असे केले तर कार्बन उत्सर्जनाची समस्या संपेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT