shahrukh khan  
Latest

Pathan Day : YRF ची मोठी घोषणा, उद्या पाहता येणार ११० रुपयांत ‘पठान’

मोहसीन मुल्ला

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉक्स ऑफिसवर शाहरुख खान (Shahrukh Khan) चा चित्रपट 'पठान' (Pathan) चा दबदबा कायम आहे.(Pathan Day) २५ जानेवारी रोजी रिलीज झालेला हा चित्रपट १००० कोटींच्या उंबरठ्यावर आहे. जगभरातील चित्रपटगृहांमध्ये पठानने आपली जादू कायम ठेवलीय. पठानचे यश सेलिब्रेट करत आता यशराज फिल्म्सने (Yash Raj Films) मोठी घोषणा केलीय. ? १७ फेब्रुवारीला चित्रपटगृहामध्ये 'पठान डे' (Pathan Day) साजरा केला जाणार असून फॅन्सना फक्त ११० रुपयांमध्ये पठान पाहता येणार आहे. (Pathan Day) ?

चित्रपट समीक्षक तरण आदर्श (Taran Adarsh) यांनी एक ट्विट शेअर केले आहे. यामध्ये त्यांनी उल्लेख केला आहे की, "पठानने डोमेस्टिक मार्केटमध्ये ५०० कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. सोबत निर्मात्यांनी 'पठान डे' सेलिब्रेट करण्याचे आयोजन करत आहेत. भारतात सर्व शोची तिकिटांची किंमत केवळ ११० रुपये फ्लॅट. #SRK #DeepikaPadukone #JohnAbraham"

याशिवाय, यशराज फिल्म्सने ट्विट केलं आहे की, जगभरात बॉक्स ऑफिसवर ९६३ कोटी रुपयांसोबत, पठान सिनेमातील इतिहासात सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला आहे. चित्रपटाने भारतात ६०० कोटी रुपये आणि परदेशात ३६३ कोटी रुपये कमावले आहेत.

चित्रपटाच्या कास्ट विषयी बोलायचं झालं तर शाहरुख खान स्टारर 'पठान' मध्ये दीपिका पादुकोण (Deepika Padukone) , जॉन अब्राहम (John Abraham) आणि डिंपल कपाडिया (Dimple Kapadia) सह अनेक स्टार्स सहभागी आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT