अमृतसर; पुढारी ऑनलाईन : दुबईहून अमृतसरला येणाऱ्या इंडिगो कंपनीच्या विमानात एका मद्यधुंद प्रवाशाने महिला कर्मचाऱ्याची छेड काढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार शनिवारी घडला. सुरक्षा व्यवस्थापकाच्या तक्रारीच्या आधारावर राजासांसी पोलिसांनी आरोपी राजिंदर सिंगला अटक केली आहे. याबाबतची तक्रार सहाय्यक सुरक्षा व्यवस्थापक अजय कुमार यांनी नोंदवली त्या आधारे आरोपी प्रवाशावर कारवाई करण्यात आली. (Passenger Misbehaved In Indigo Flight)
दरम्यान, आरोपीची ओळख पटली असून त्याचे नाव राजिंदर सिंग असून तो जालंधरच्या कोटली या गावाचा रहिवासी आहे. विमान अमृतसरला उतरताचा आरोपी प्रवाशाला अटक करण्यात आली. आरोपीने इतकी दारु पिली होती की त्याला कोणतीच शुद्ध नव्हती. आरोपी प्रवाशांवर पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याला रविवारी कोर्टासमोर हजर करण्यात आले. कोर्टाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. (Passenger Misbehaved In Indigo Flight)
शनिवारी दुबईहून अमृतसरला येणाऱ्या इंडिगोच्या विमानात आरोपी प्रवासी राजिंदर सिंहने चांगलाच गोंधळ घातला. प्रवासाच्या दरम्यान त्याने दारु पिऊन महिला कर्मचाऱ्याची छेड काढली व विमानात जोरजोरात आराडा ओरड-करु लागला होता. (Passenger Misbehaved In Indigo Flight)
यापूर्वी विमानात किस करण्याचे प्रकरण आले होते समोर
यापूर्वी अलास्काला जाणाऱ्या डेल्टा एअरलाइन्सच्या फ्लाइटमध्ये एका प्रवाशाने अटेंडंटच्या मानेवर किस करून कॅप्टनच्या जेवणाचा ट्रे फोडल्याची घटना घडली होती. 10 एप्रिल रोजी मिनेसोटाहून आलेल्या या फ्लाइटमध्ये 61 वर्षीय फर्स्ट क्लास प्रवासी डेव्हिड अॅलन बर्क याने पुरुष फ्लाइट अटेंडंटच्या मानेवर किस केले होते.
अधिक वाचा :