पुढारी वृत्तसेवा, नवी दिल्ली दि 6, Parliament session : संसदेचे पावसाळी अधिवेशन येत्या 20 तारखेपासून सुरु होणार आहे. तत्पूर्वी एक दिवस आधी 19 जुलै रोजी केंद्र सरकारकडून सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीला एक वर्षापेक्षा कमी कालावधी राहिला आहे, त्यामुळे अधिवेशनात विविध मुद्यांवरुन सरकारची कोंडी करण्याचा विरोधी पक्षांचा निर्धार आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाने अलिकडेच डेटा संरक्षण विधेयकावर शिक्कामोर्तब केले होते. पावसाळी अधिवेशनात हे विधेयक संसदेत मंजूर करुन घेण्याचा सरकारचा प्रयत्न राहील. अधिवेशनात बहुचर्चित समान नागरी कायद्याबाबतचे विधेयक चर्चा आणि मंजुरीसाठी मांडले जाणार काय, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. कायदा आयोगाने या मुद्यावर येत्या 13 तारखेपर्यंत धार्मिक संस्था आणि नागरिकांकडून मते मागविलेली आहेत. 23 दिवस चालणाऱ्या पावसाळी अधिवेशनाचे 17 कामकाजी दिवस राहणार आहेत.
हे ही वाचा :