Mission Raniganj  
Latest

Mission Raniganj : अक्षय-परिणीतीचा ‘कीमती’ गाण्यात रोमान्स (Video)

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : अक्षय कुमार-परिणीती चोप्रा दोघेही आपल्या आगामी चित्रपटावरून चर्चेत आहेत. 'मिशन रानीगंज- द ग्रेट भारत रेस्क्यू' लवकरच रिलीज होणार आहे. चित्रपटाचे पोस्टर, टीझर रिलीज झाला आहे. दरम्यान, या चित्रपटातील एक गाणे रिलीज झाले आहे. या 'कीमती' असे या गाण्याचे नाव आहे. या चित्रपटाचतील गाण्याविषयी अक्षय कुमारने इन्स्टा पोस्टच्या माध्यमातून हिंट दिली होती. (Mission Raniganj) अक्षय कुमारने आपल्या पोस्टमध्ये परिणीती चोप्राला जे गिफ्ट देण्याबद्दल म्हटले होते, ते 'मिशन रानीगंज' चित्रपटातील पहिले गाणे 'कीमती' होते. या गाण्यात अक्षय – परिणीती गार्डनमध्ये रोमँटिक मूडमध्ये दिसत आहेत. सिंपल साडी आणि केसांचा अंबाडा असा तिचा लूक आहे. काही मिनिटातचं हे गाणे व्हायरल झाले. आतापर्यंत या गाण्याने ३ लाखांहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत. (Mission Raniganj )

या दिवशी रिलीज होणार चित्रपट

'मिशन रानीगंज- द ग्रेट भारत रेस्क्यू' ६ ऑक्टोबर २०२३ रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. टीनू सुरेश देसाई यांच्या या चित्रपटात अक्षय कुमार-परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत आहेत. अक्षय कुमार पुन्हा एकदा सरदारच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट एका रिअल लाईफ रेस्क्यू ऑपरेशनवर आधारित आहे.

संबंधित बातम्या-

 There's nothing more #Keemti than love ❤️@ParineetiChopra , here's a gift for your special day, coming tomorrow!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT