T20 World Cup 
Latest

T20World Cup : झिम्बाब्वे सोबत हरल्यानंतर पाकिस्तानी फलंदाज पॅवेलियनमध्येच ढसाढसा रडला (पाहा व्हिडिओ)

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : T20 World Cup चा थरार चांगलाच रंगत चालला आहे. पर्थ येथे गुरुवारी झालेल्या आयसीसी T20 World Cup च्या सुपर 12 च्या ग्रुप 2 च्या सामन्यात पाकिस्तानला झिम्बाब्वेकडून अवघ्या 1 रनाने हार मानावी लागली. अत्यंत रोमांचक असलेल्या या सामन्यात झिम्बाब्वेने पाकला अखेल नमवले. त्यानंतर हे दुःख पचवणे पाकिस्तानच्या स्टार फलंदाज शादाब खानला अनावर झाले. तो पेवेलेयिनमध्येच बसून ढसाढसा रडला.

मागील रेकॉर्ड पाहता बाबर आजमच्या नेतृत्वात पाकिस्तानला झिम्बाब्वे विरुद्ध सहजासहजी विजय मिळवता येईल असे वाटत होते. तसेच मात्र पाकिस्तानचे सर्व खेळाडू थोड्या-थोड्या अंतराने आऊट झाले.

T20World Cup :  कर्णधार बाबर आणि यष्टिरक्षक मोहम्मद रिझवान लवकर बाद झाले आणि त्यामुळे पाकिस्तानची मधली फळी पुन्हा उघड झाली. शान मसूदने काही धावा केल्या. त्याने भारताविरुद्ध खेळल्या गेलेल्या डावाप्रमाणे सामना (IND vs PAK) राखण्याचा प्रयत्न केला. त्याने आणि शादाब खान (१७ धावा) यांनी चौथ्या विकेटसाठी ५२ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली, ज्यामुळे पाकिस्तानला विजयाच्या दारात पोहोचवले. पण कमी षटके आणि नियमित विकेट्समुळे झिम्बाब्वेला फायदा झाला आणि त्यांनी शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जिंकला.

T20World Cup : हातातोंडाशी आलेला विजय अशा पद्धतीने हिरावल्याने पाकिस्तानी खेळाडू आणि फॅन्स हे सर्वच जण खूपच निराश झाले होते. पेवेलियनमध्ये परतत असताना शादाब खान याला भावना अनावर झाल्या नाही. तो पेवेलियमध्ये गुडघे टेकून बसून ओंजळीत तोंड घेऊन ढसाढसा रडला. नंतर संघातील एका खेळाडूने त्याला सांत्वना दिली व त्याला आत घेऊन गेला.

T20 World Cup : तसेच सामन्यानंतर झिम्बाब्वे आणि पाकिस्तानमध्ये मिस्टर बीनवरून ट्विटरवार रंगला. ज्यामध्ये अगदी झिम्बाब्वेचे राष्ट्रपती आणि पाकिस्तानचे पंतप्रधान देखिल आपआपसात भिडले.

हे ही वाचा ;

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT