नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : पाकिस्तानातील (Pakistan) बहवलनगरमध्ये गुरूवारी शिया मुस्लिमांच्या जुलूसमध्ये एक मोठा स्फोट झाला. समाेर आलेल्या माहितीनुसार शिया मुस्लिमांची अशूरा जुलूस दरम्यान रस्त्याच्या कडेला हा स्फोट झाला. यामध्ये दोन व्यक्तींचा मृत्यू आणि आणखी काही लोक जखमी झाल्याची माहिती आहे.
मृत्यू पावलेल्या व्यक्तींमध्ये ७ वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. पोलिसांनी ग्रेनेड फेकणाऱ्या व्यक्तीला अटक केलेली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार अटक केलेल्या व्यक्तीची चौकशी केली जाणार आहे. या ग्रेनेडच्या स्फोटात जखमी झालेल्या व्यक्तींना रुग्णालयात दाखल केलेले आहे.
स्थानिक पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार आज सकाळी १० वाजता यात्रेवर ग्रेनेड फेकण्यात आले. बहवलनगर लाहोरपासून २६० किलोमीटर अंतरावर आहे. विरुद्ध पक्षाचे नेते (Pakistan) सेहर कामरान यांनी या घटनेचा तीव्र निषेध केलेला आहे. ही बाब निंदनीय आहे, असंही ते म्हणाले.
पोलिस अधिकारी मोहम्मद असद आणि शिया नेता खावर शफाकत यांनी या घटनेची पुष्टी केलेली आहे. या घटनेनंतर शहरात तणाव वाढला आहे. शिया लोकांनी या घटनेबद्दल निषेध नोंदवत याचा बदला घेण्याची मागणी केलेली आहे.
शफाकत म्हणाले की, "ज्यावेळी स्फोट झाला तेव्हा हा जुलूस गर्दीचं ठिकाण असणाऱ्या मुहाजीर काॅलनीतून जात होती. सरकारने या घटनेची तातडीने दखल घेऊन जुलूसच्या संरक्षणाची व्यवस्था वाढवावी. शहराच्या इतर भागांतही असे जुलूस काढले जात आहेत."
पहा व्हिडीओ : अफगाणिस्तान : काबूल विमानतळावर उडताना विमान तिघेजण कोसळलं