Latest

Pakistan Elections 2024 : पाकिस्तान पंतप्रधानपदासाठी रस्सीखेच कायम; दोन्ही पक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: पाकिस्तानमध्ये ८ फेब्रुवारीला सार्वजनिक निवडणुका पार पडल्या. निकालात काेणत्‍याही एका पक्षाला स्‍पष्‍ट बहुमत नसल्‍याने देशात आघाडी सरकार येणार हे आता स्‍पष्‍ट झाले आहे. आज (दि. १५) पंतप्रधान पदासाठी पाकिस्तान पीपल्स पार्टी (PPP) आणि इम्रान खान यांच्या तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) या दोन्ही पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. पाकिस्तान मीडियाचा हवाला देत या संदर्भातील वृत्त 'एएनआय'ने दिले आहे. (Pakistan Elections 2024)

इम्रान खान यांच्‍या पक्षाने दिली ओमर अयुब यांना उमेदवारी

पाकिस्तानात एकूण २६६ जागांसाठी निवडणुक प्रक्रिया पार पडली. यानंतर सार्वजनिक निवडणुकांचे काही कल हाती आले. तर काही मतदारसंघात निवडणुक आयोगाकडून पुर्ननिवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये कोणालाही स्पष्ट बहुमत नाही. त्यामुळे अपक्ष उमेदवारांवर पाकिस्तान पंतप्रधानपदी कोणाची वर्णी लागणार यासाठी रस्सीखेच सुरूच आहे. दरम्यान पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान समर्थित अपक्षांना ९३ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे पंतप्रधान पदावर दावा सांगत खान यांच्या पक्षाने ओमर अयुब खान यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे. तर नवाझ शरीफ यांनी त्यांचे धाकटे भाऊ शाहबाज शरीफ यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे. (Pakistan Elections 2024)

इम्रान खान समर्थित अपक्ष ९३ उमेदवार विजयी

पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) चे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी यांनी पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून माघार घेत, त्यांनी नवाज शरिफ यांच्या पक्षाला बाहेरून पाठींबा देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ते सरकारमध्ये सहभागी होणार नाहीत, असेही भुट्टो यांनी म्हटले आहे.  निवडणुकीत पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान समर्थित अपक्ष उमेदवारांना ९३ जागा मिळाल्या. नवाज शरिफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग या पक्षाला ७५ तर पाकिस्तान पीपल्स पार्टीला ५४ जागा मिळाल्या आहेत.

कोण आहेत PM उमेदवार ओमर अयुब खान?

ओमर आयुब खान हे ज्येष्ठ खासदार आहेत. ते माजी परराष्ट्र मंत्री गोहर अयुब खान यांचा मुलगा आणि माजी राष्‍ट्रपती अयुब खान यांचे नातू आहेत. अतिशय नम्र व्यक्तिमत्व, अशीही त्‍यांची ओळख आहे. पीटीआयचे संस्थापक अध्यक्ष इम्रान खान यांची भेट घेतल्यानंतर असद कैसर यांनी हा निर्णय जाहीर केला.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT