कोहिस्तान : इस्लाम धर्म व प्रेषितांवर टीका केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला चिनी अधिकारी. पोलिस पोहोचले म्हणून बरे; अन्यथा जमाव त्याला ठारच करणार होता. मंगळवारी या चिनी अधिकार्‍याला सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले.  
Latest

Pakistan : चिनी कंपन्यांना कराचीत एकापाठोपाठ टाळे; पाकिस्तान पोलिसांची कारवाई

अमृता चौगुले

कराची; वृत्तसंस्था : पाकिस्तानातील कराची येथे पोलिसांनी चिनी नागरिकांच्या काही कंपन्यांना, व्यवसायांना टाळे ठोकले आहे. एक उपाहारगृह, एक सुपरमार्केट व मरीन-प्रॉडक्ट (सागरी उत्पादने) कंपनीचा त्यात समावेश आहे. चिनी नागरिकांवर दहशतवादी हल्ल्यांच्या भीतीपोटी ही कार्यवाही करण्यात आली आहे. पाकिस्तान्यांमध्ये आधीच चिन्यांबद्दल असलेला रोष एका चिनी अधिकार्‍याने इस्लामवर टीका केल्याने सध्या फारच उफाळून आलेला आहे.(Pakistan)

हा रोष पाहता, 60 अब्ज डॉलर खर्चाच्या चीन-पाक आर्थिक कॉरिडोरवर आतापर्यंत केलेला 40 अब्ज डॉलरचा खर्च पाण्यात तर जाणार नाही, अशी भीती चीनला सतावते आहे. (Pakistan)

'ड्रॅगन'कडून गिळले जाण्याची भीती (Pakistan)

  • नवे व्यवसाय व खाणकामाच्या नावाखाली चीन जमिनी बळकावत असल्याचे एक कारण त्यामागे आहे.
  • चीन-पाक आर्थिक कॉरिडोरच्या नावाखाली चीन आपल्या देशालाच गिळेल, अशी भीती स्थानिकांतून आहे.

पाककडून चीनचे ब्लॅकमेलिंग

  • चीनने वारंवार कळवूनही पाकिस्तानने चिनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी विशेष काही केलेले नाही.
  • कर्जमाफी द्या, मग सुरक्षा देतो. त्यासाठीच्या व्यवस्थेवर खर्चासाठी पैसे नाहीत, असे पाकचे म्हणणे आहे.
  • चीनने कर्जमाफी न दिल्यास पाक डिफॉल्टर ठरू शकतो. पाक चीनला ब्लॅकमेलिंग करतो आहे.

पाकमधील हल्ल्यांत 25 चिनी ठार

  • गतवर्षी चिनी अभियंत्यांच्या बसवर हल्ला झाला होता. त्यात 10 चिनी अभियंते मरण पावले होते. बलुच दहशतवाद्यांचा यात हात होता.
  • पेशावरमध्येही गतवर्षी एका हल्ल्यात चिनी डॉक्टर जोडपे व त्यांचे पालक (2 वृद्ध) ठार झाले होते.
  • एप्रिल 2022 मध्ये आत्मघातकी हल्ल्यात 4 चिनी महिला प्राध्यापकांचा मृत्यू झाला होता. एका पाक महिलेने हा हल्ला केला होता.
  • तत्पूर्वी, पेशावर व क्वेटात झालेल्या 4 हल्ल्यांत एकूण 7 चिनी मारले गेले.

अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT