File Photo  
Latest

दीपावलीच्या सुट्टीनंतर कांदा लिलाव सुरू, कांदा दरात ४०० रुपयांची वाढ

रणजित गायकवाड

दीपावलीच्या दहा दिवसांच्या सुट्टीनंतर लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारावर कांदा लिलाव पूर्ववत सुरू होऊन उन्हाळ कांद्याला कमाल ३२५१ भाव मिळाला. कांद्याचे लिलाव सुरू होताच बाजार भावात चारशे रुपयांची प्रतिक्विंटल मागे वाढ झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले मात्र विदेशातील कांदा आयात न करण्याची मागणी यावेळी केंद्र सरकारकडे माध्यमांमधून केली.कांद्याच्या आगारांमध्ये कांदा लिलाव सुरू झाल्याने बाजारपेठेमध्ये चांगलीच रौनक काम बघायला मिळाले.

मागील वर्षी याच कालावधीत उन्हाळ कांद्याला

कांद्याला कमीत कमी ८०० सरासरी ३६३६, जास्तीतजास्त ६३०० रुपये भाव मिळाला. तर लाल कांद्याला कमीत कमी ७०० सरासरी ३४६८, जास्तीतजास्त ५१०१ रुपये भाव मिळाला.मागील  वर्षीच्या तुलनेमध्ये कांद्याचे कमाल  दर हे निम्याहून कमी आहे.

शहरी भागात किरकोळ कांदा भावाने तेजी घेताच भाव नियंत्रण करण्यासाठी केंद्र सरकारने आयकर विभागामार्फत पिंपळगाव बसवंत येथील व्यापाऱ्यांवर धाडी टाकल्या यानंतर नाफेड मार्फत खरेदी केलेल्या दोन लाख मेट्रिक टन कांद्यापैकी एक लाखाहून अधिक मेट्रिक टन कांदा शहरी भागात पाठवून कांदा दर स्थिर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

यांनातर आता मुंबईतील चार निर्यातदारांनी थेट ५९ कंटेनर इराणचा कांदा मुंबईत मागवला.त्यापैकी २४ कंटेनर एपीएमसी मार्केट यार्डात दाखल झाले आहे.

मुंबईतील चार बड्या निर्यातदारांनी थेट इराणचा ५९ कंटेनर कांदा मुंबईत मागवला.त्यापैकी २४ कंटेनर कांदा जेएनपीटी बंदरातुन नवी मुंबई एपीएमसी मार्केट यार्डात दाखल झाला. तर ३५ कंटेनर कांदा अजून जेएनपीटी बंदरात क्लेरिंगसाठी अडकून आहे. एका कंटेनर मध्ये सुमारे २० टन कांदा असतो. एकूण ५९ कंटेनर मध्ये ११८० टन इराणचा कांदा येत्या तीन दिवसात मुंबईत येईल. हा कांदा मुंबईसह दिल्ली,गुजरात, अहमदाबाद, पंजाब,राजस्थान, मध्य प्रदेश, दक्षिण भारतातील राज्यात पाठवला जाणार आहे. या कांद्याची टिकवण क्षमता कमी असून या कांद्याला आपल्या नाशिक सारख्या कांद्याची चव नसल्याने हा कांदा फक्त हॉटेल व्यवसायिक खरेदी करतात.  इराणचा कांदा मुंबईत आल्यामुळे त्याचा राज्यातील कांद्याच्या दरावर कुठला ही परिणाम होणार नसल्याची माहिती जाणकार देत आहे.

येथील बाजार समितीत बाजार समितीत उन्हाळ कांद्याला कमीत कमी ७०० सरासरी २९०० तर जास्तीतजास्त ३२५१ रुपये भाव मिळाला. तर लाल कांद्याला  सरासरी २९६०, जास्तीतजास्त ३१०२ रुपये भाव मिळाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT