Latest

Mukesh Ambani Death Threat | मुकेश अंबानींना धमकी देणारा सापडला, १९ वर्षीय तरुणाला अटक

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना धमकीचे अनेक ई- मेल पाठवल्याप्रकरणी तेलंगणातून एका १९ वर्षीय संशयिताला अटक करण्यात आली आहे. गणेश रमेश वनपारधी असे संशयित आरोपीचे नाव आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला ८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती गावदेवी पोलिसांनी दिली आहे.

संबंधित बातम्या 

मुकेश अंबानी यांना ३१ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर दरम्यान पुन्हा एकदा दोन धमकीचे ईमेल प्राप्त झाले होते. ज्यात त्यांना मागे पाठवलेल्या ई- मेलकडे दुर्लक्ष केल्याबद्दल गंभीर परिणामांचा इशारा दिला होता. अंबानींना धमकी देणाऱ्या व्यक्तीने ४०० कोटी रुपयांची मागणी केली होती, असे पोलिसांनी सांगितले.

याआधी धमकीचा मेल पाठवणाऱ्याने २० कोटी रुपयांची मागणी केली होती. "तुम्ही आम्हाला २० कोटी रुपये दिले नाहीत, तर आम्ही तुम्हाला ठार मारू. आमच्याकडे भारतातील बेस्ट शूटर्स आहेत."

त्यानंतरच्या ई- मेलमध्ये संशयिताने ४०० कोटींची मागणी केली होती. त्याने म्हटले होते की, "पोलिस माझा माग काढू शकत नाहीत, ते मला अटकही करू शकत नाहीत…"

अंबानींचे सुरक्षा प्रमुख देवेंद्र मुनसीराम यांच्या तक्रारीच्या आधारे गावदेवी पोलिसांनी धमकीचा मेल पाठवणाऱ्याविरुद्ध खंडणी मागणे आणि धमकी दिल्याप्रकरणी एफआयआर नोंदवला होता.

"हा काही मुलांनी मिळून केलेला खोडसाळपणा असल्याचे दिसून येते. आमचा तपास सुरू आहे आणि आम्ही या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करू," असे मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या घटनेला दुजोरा देताना सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT