पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑलिम्पिक २०३६'च्या यजमानपदासाठी भारत बोली लावणार आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबाबत आज (दि.१४) अधिकृत घोषणा केली आहे. मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये १४१ व्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) सत्राच्या उद्घाटनावेळी पंतप्रधान मोदींनी ही घोषणा केली. ऑलिम्पिकचे आयोजन करण्यासाठी भारत खूप उत्साहित आहे, असेही या वेळी बोलताना ते म्हणाले आहेत. (Olympics 2036)
पंतप्रधान मोदी म्हणाले, "ऑलिम्पिक २०३६ आयोजित करण्याच्या आमच्या प्रयत्नांमध्ये भारत कोणतीही कसर सोडणार नाही. हे १४० कोटी भारतीयांचे स्वप्न आहे. आयओसीच्या पाठिंब्याने आम्हाला हे स्वप्न पूर्ण करायचे आहे. खेळ हा केवळ पदकं जिंकण्यासाठी नसून मने जिंकण्याचा उत्तम मार्ग आहे." (Olympics 2036)
२०२९ मधील युवा ऑलिम्पिकचे यजमानपद भारतालाही देण्याची इच्छा असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. आम्ही २०२९ च्या युवा ऑलिम्पिकचे आयोजन करण्यास इच्छुक आहोत. मला खात्री आहे की, भारताला IOC कडून सतत पाठिंबा मिळेल," असे पीएम मोदी IOC अध्यक्ष थॉमस बाख यांच्या उपस्थितीत म्हणाले. (Olympics 2036)