Latest

ऑफिस वेअर आयडिया: ऑफिसमध्ये कंफर्टेबल राहताना स्टायलिश दिसण्यासाठी लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन: तुमचा ड्रेसिंग सेन्स हा तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा असतो, त्यामुळे ते निवडताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. एक मजबूत आणि आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्व हे आयुष्यात पुढे जाण्याचा मार्ग सोपा बनवू शकते. आणि त्यासाठी तुमचे दिसणे खूप महत्त्वाचे आहे. तर आज आपण ऑफिस वेअरशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत.

1. कॅज्युअल वेअर टाळा

ऑफिसमधला कॅज्युअल लूक देखील तुमची वागणूक कॅज्युअल आहे असे दर्शवतो तर प्रोफेशनल लूक सीरियनेस दाखवतो. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी. कोणत्याही एका दिवशी असा लूक कॅरी करायला हरकत नाही. पण जर तुम्ही आठवड्यातून पाच दिवस कॅज्युअल वेअर्समध्ये ऑफिसला जात असाल तर ते योग्य नाही.

2. साइज आणि कंफर्टची काळजी घ्या

परफेक्ट फिटिंग आणि कम्फर्ट यांच्यात योग्य संतुलन राखणे फार महत्वाचे आहे. सुटेबल कपडे तुम्हाला प्रेझेंटेबल बनवतात तर खूप घट्ट कपडे तुम्हाला अस्वस्थ करतात. त्यामुळे ऑफिससाठी नेहमी असे कपडे निवडा, जे परिधान करून तुम्ही आरामात बसून काम करू शकता. शरीराच्या प्रकारानुसार कपडे परिधान केल्याने तुम्हाला आरामदायक आणि आत्मविश्वास दोन्ही राहतो. कधीही कोणताही ट्रेंड फॉलो करू नका, कारण ते तुम्हाला शोभतील असे नाही.

3. तुमचे कपडे तुमचा आत्मविश्वास दर्शवतात

आत्मविश्वास असणारा माणूस नेहमीच लोकांना आकर्षित करतो, त्यामुळे ऑफिससाठी नेहमी असे कपडे निवडा जे परिधान करून तुम्हाला आत्मविश्वास वाटेल, मग ती जीन्स-शर्ट, सूट किंवा साडी असो. रंग किंवा फॅब्रिकमध्ये कोणत्याही प्रकारची विशेष निवड असेल तर त्याला प्राधान्य द्या. कारण कुठेतरी आत्मविश्वास तुमच्या कामावरही परिणाम करतो.

4. फुटवेअरवरही लक्ष द्या

महिलांचे बहुतांश लक्ष कपड्यांवरच असते. फुटवेअर निवडताना त्या ब्रँड आणि त्याच्या गुणवत्तेकडे जास्त लक्ष देत नाही, ही एक अतिशय वाईट सवय आहे. कपड्यांमध्ये आरामदायी असणे आवश्यक आहे तेवढचं फुटवेअरमधेही आवश्यक आहे. एका अभ्यासानुसार, बहुतेक लोक प्रथम तुमच्याफुटवेअरकडे लक्ष देतात, कपड्यांवर नव्हे, म्हणून हे लक्षात ठेवण्याची गरज आहे. बर्‍याच कपड्यांशी सहज जुळणारे पादत्राणे चांगल्या प्रतीची खरेदी करा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT